Restaurent Review - विष्णुजी कि रसोई


खरंतर ही पोस्ट लिहायला जरा उशीरच झालाय, restaurent चा review तिथल्या जेवणाची चव जिभेवर  असतानाच लिहिला तर त्याला खरा न्याय मिळतो. असो, ‘देर आये पर दुरुस्त आये’ म्हणून लिहायला सुरुवात करते.


एका अतिशय बिझी वीकेंड च्या संध्याकाळी आमच्या १० लोकांच्या मोठ्या कुटुंबाचा जेवणाचा बेत ठरला. वेगवेगळ्या वयोगटातील आणि अवडीनिवाडी असणारे सगळेजण म्हणून ‘विष्णुजी कि रसोई’ ची निवड झाली. तिथे पोचलो तेंव्हा ambiance ने निश्चितच लक्ष वेधून घेतले. एकंदर वातावरणाला आणि जेवणाला गावाकडचा फील देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय हे बघताक्षणीच लक्षात आले.


इथली जेवणाची पद्धत buffet प्रकारात मोडते. आधीच पैसे भरून टोकन घेतले आणि आत गेलो. इथे general waiting staff ऐवजी facilitators होते ज्यांनी आम्हाला वेगवेगळ्या विभागांची माहिती करून दिली. starter म्हणून आलेले सूप चविष्ट होते. मुख्य आकर्षण म्हणजे थालीपीठ, झुणका - भाकरी आवडले. मला प्रचंड आवडणार पंचामृत बघून मस्त वाटले. एकुणात चवीच्या बाबतीत कुठे कमतरता नव्हती.


मात्र, मुख्य उणीव जाणवली ती नियोजनाची. हॉटेलच्या एका भागात बर्थडे पार्टी सुरु होती जिचा सगळा आवाज आणि गोंगाट इतरत्र जाणवत होता. पार्टी साठी स्वतंत्र विभाग असणे आवशयक वाटले. नाही म्हणायला background ला music सुरु होते, पण गाण्यांचे selection  अगदीच सुमार वाटले.


तसेच गर्दीतून वाट काढून कसेबसे buffet पर्यंत पोचायचे आणि एखादा पदार्थ वाढून आणायचा, त्यासाठी दोन चार खेपा करायच्या हा एकंदर अनुभव फारसा रुचला नाही. किंबहुना एखाद्या लग्नाच्या dinning मध्ये जेवल्यासारखे वाटले. पदार्थ आणण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कसरतीमुळे सहभोजनाचा आनंद अजिबात घेता आला नाही. तसेच बर्यापैकी expensive थाळी असूनही पुरणपोळी साठी वेगळी किंमत मोजायची हे कुठेतरी खटकले.


एकूणच चांगली संकल्पना पण नियोजनाचा अभाव असे ‘विष्णुजी कि रसोई’ बद्दल थोडक्यात सांगता येईल.


नाव - विष्णुजी कि रसोई
लोकेशन - एरंडवणे पुणे
खाद्यप्रकार - महाराष्ट्रीयन, फ्युजन
रेटिंग - ३/५

Restaurent Review - थाट बाट

आज गुढी पाडव्याच्या निमित्ताने बाहेर जेवण्याचा बेत ठरला. सणाचे निमित्त असल्याने fast food किंवा street food ऐवजी थाळी खाण्याचा विचार योग्य वाटला आणि ऐकीव अनुभवावरून थाट बाट ला जाण्याचे ठरले.

restaurant ला फोन केला तेंव्हा आम्ही reservation घेत नाही, पण नाव लिहून ठेवतो असे सांगण्यात आले. reservation घेणार नाही तर नाव लिहून ठेवण्याचे प्रयोजन मुळीच लक्षात आले नाही.

आत्तापर्यंतच्या थाळी restaurants च्या अनुभवावरून मला एक गोष्ट नेहमी खटकते, ती म्हणजे इथे लोक फक्त खूप भूक लागली म्हणून आणि यथेच्छ जेवण या एकाच उद्देशाने येतात असा सोयीस्कर समज management ने करून घेतलेला असतो. तश्याच mindset चा परिणाम म्हणून इथला ambiance अगदीच दुर्लक्षित वाटला. टेबल खुर्च्या अगदी खेटून मांडलेल्या आणि त्यात वेटर्स आणि ग्राहक यांना एका चिंचोळ्या वाटेतून मार्ग काढावा लागत होता.

जेवण ठराविक राजस्थानी पद्धतीचे होते ज्यामध्ये भरपूर पदार्थ available होते. चवीला जेवण छान होते आणि अपेक्षेप्रमाणे गरम देखील. तसेच नावाला शोभावे म्हणून जेवण चांदीच्या ताटात serve करण्यात आले. हे सर्व plus points होते.

पण वाढताना वेटर्स अगदी घायकुतीला आले होते, त्यामुळे वाढण्याआधी प्रत्येक पदार्थ थोडातरी ताटबहेर सांडत होता आणि जेवणाचा थाट कमी करत होता. background ला music play होत नसल्यामुळे एकंदर गोंगाट जास्तच जाणवत होता.

overall चवीच्या आणि जेवणाच्या दृष्टीने restaurant changle watale पण management ने ambiance आणि service वर भर देण्याची नक्कीच गरज आहे.

नाव - थाट बाट
लोकेशन - कर्वे रस्ता, कोथरूड, पुणे
खाद्य प्रकार - राजस्थानी थाळी
रेटिंग - २/५

नवा उपक्रम - Restaurant Reviews

गेल्याच आठवड्यात long term साठी  पुण्यात राहायला आले. इतकी वर्ष बाहेर राहिल्याने इकडच्या आठवणींची पाटी  अगदी कोरी झाली आहे. तसंही ज्या जुन्या आठवणी आहेत त्या सगळ्या औरंगाबादच्या आणि कॉलेज मधल्या, त्यामुळे पुण्याबद्दल माझ नक्की अस काही मत सध्या तरी नाहीये. पण प्रत्येक नव्या गोष्टीकडे कुतीहालाने बघायचे असे मात्र ठरवून टाकले आहे


आज गुढी पाडव्याच्या निमित्ताने बाहेर जेवायला जाण्याचा बेत केला. इथले खाण्याचे शौकीन आणि आणि इथली अनेक खाद्य श्रद्धास्थान मला ऐकून माहित असल्यामुळे एखादा मस्त अनुभव घेण्याची उत्सुकता नक्कीच होती. अर्थातच आत्तापर्यंतच्या सवयीप्रमाणे restuarent येल्प/फोर स्क्वेअर/ झोमाटो वगैरे वर शोधण्याचा एक प्रयत्न करून पहिला आणि तेंव्हा प्रकर्षाने जाणवले कि इतके  खाण्याचे शौकीन असूनदेखील restaurant चे online reviews अगदी नावालाच आहेत. तेंव्हाच ठरवले कि ब्लोग वर restuarent चे reviewes टाकायचे आणि वेब वर सुद्धा.


तसा हा नवीन उपक्रम करायचा विचार बऱ्याच   दिवसांपासून होता. एकंदरीत च online platforms भरपूर उपलब्ध असूनही त्यांचा योग्य वापर करणारे आणि content contribution करणारे लोक खूपच कमी अहेत. आणि त्यामुळे नुकसान देखील आपलेच होतेय. चांगले दर्जेदार businesses व्यवस्थितपणे publicize होत नाहीत आणि आपल्याला देखील ऐनवेळी एखादी सेवा दर्जेदाररित्या  कुठे उपलब्ध होईल हे समजत नाही.


असो तर आता या नवीन उपक्रमाला माझ्या नव्या नवलाईचा हुरूप चढला आहे. आणि म्हणूनच आजपासून मी भेट दिलेल्या सर्व restaurant चा honest review लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे.