खरतर मला सूर्यास्त खूप आवडतो. सूर्यास्त, संध्याकाळचा गार वारा, पक्ष्यांचा किलबिलाट, या सगळ्याची मी प्रचंड फॅन आहे. सूर्यास्ताची वेळ दिवसभरातील माझी favorite. म्हणजे पहाटेची साखरझोप, सकाळची लगबग, दुपारची अर्धवट पेंगत आणि झोप जावी म्हणून चहा घेत डोळे ताणुन काम करायची वेळ, किंवा रात्री finally I can hit my bed now… या सगळ्या वेळांचे महत्व आपापल्या ठिकाणी आहेच. पण संध्याकालाचे तसे नसते, ऑफिस मधुन आल्यावर दिवसभर आपण काहीतरी fruitful केले (अगदी कधी कधी दिवसभर यथेच्छ कालहरण I mean time pass तरीही) याचे समाधान असते. आपले घर आपल्याला बोलावत आहे असे वाटते. अगदी माझ्यासारख्या परक्या देशात आणि perfectly strange unknowen city मधे एकटीने रहाणिरिला सुद्धा घरची ओढ लागते, मग जे family सोबत राहत आहेत त्यांची तर गोष्टच सोडा.
अश्या सुंदर संध्याकाळी घरी येऊन मस्त चहाचा कप हतात घ्यावा, laptop वर सलील-संदीप चे 'आयुष्यावर बोलू काही' लावावे. बाहेर साचलेल्या बर्फाकडे खोलीच्या खिडकीतून पहात गाणी गुणगुणत निवांत तास दीड तास, (अगदी घडाळ्याकडे न बघता) घालवावा. माझ्या Me Time एन्जॉय करण्याची ही perfect definition आहे.
अश्या वेळी कोणि online ping करू नये, in fact online जाउ च नये, आणि तरीसुद्धा online असणे माझ्यासारखा तुमच्या ही जिवनाचा अविभाज्य घटक I mean integral part बनलच असेल तर invisible राहावे. फोन सुद्धा silent mode वर करून ठेवावा, roommate ला काहीतरी थाप मारुन खोलितच बसावे, चुकुनही common area मधे भटकू नये, नाहीतर तुमच्यातील light bills, rent, grocery, lunch, dinner अश्या कधीही न संपणार्या विषयावर बोलणे सुरू होईल आणि सन्ध्यकाळचि सुंदर वेळ बघता बघता कपूरसारखी उडून जाईल.
कपातुन चहाचा एक एक घोट घेताना, नकळत दूर घरच्या आठवणींमधे रमुन जावे. थेट पोहोचावे घरातल्या टिपिकल संध्याकाळी असाच आई सोबत बसून चहा घेताना, मस्त गॉसिप करावी, कॉलेज मधल्या आवडत्या आणि नवडत्या मित्र मैत्रिणिंच्या लाइफ मधे काय चालले आहे हे आई ला सांगावे. त्यावर आपली मते मांडावी. आई ती शांतपणे ऐकून घेते. माझ्या काही वाटण्या न वाटण्या ने मित्रांच्या आयुष्यात काही फरक पडणार नाहीये हे तिला कळलेले असते. पण माझे स्वतंत्र विचार मांडायला मी समर्थ आहे आणि ते मांडायची माझी वैचारिक पातळी (?) I mean level of thinking डेवेलप झाली आहे हे सांगण्याचा माझा खटाटोप मी सुरुच ठेवावा.
मग अगदी कपातला चहा संपला तरी माझी मत प्रदर्शन काही संपत नाही. आई चा चहा केन्व्हाच संपला असतो.. आणि ती संध्याकाळच्या जेवणाच्या तयरिलाही लागलेली असते. पण मी मात्र अजूनही एक पाय दुसर्या पायावर रोवून ओट्यशेजारि टेकून उभे राहून आईला काही बाही ऐकवत असते... सहज माझे लक्ष खिडकीतून बाहेर जाते. सूर्यास्त जवळ जवळ संपलेला असतो. सूर्यास्त संपून अंधार पडायच्या अगदी आधीची वेळ, twilight time…
पक्ष्यांची शाळा आता झाडावर भरलेली असते, झाडाच्या पानांचा सळसळाट मिनितागणिक वाढतच जातो, ही संध्याकाळची वेळ मात्र मनाला उगाच हूरहुर लावून जाते. आज इतक्या आरामात आईशी गप्पा मारणारी मी उद्या कुठे असेन कोण जाणे. हे माझे मित्र मैत्रिणि ज्यांच्या लाइफ वर मी आज अगदी सहज हक्काने मते नोंदवून मोकळी होते, ते जगाच्या कुठल्या टोकाला असतील, आणि काय करत असतील, पक्ष्यांचा हा किलबिलाट काही वर्षांनी असाच माझ्या कानी पडेल का, असे काहीतरी विचित्र प्रश्न मला पडायला लागतात. मग कळते ह्या वेळेला कतरवेळ का म्हणतात..
आज जेंव्हा दूर देशी बसून माझ्या खोलीच्या खिडकीतून तीच कतरवेळ पाहते, तेंव्हा ना समोर आई असते, ना सांगायला तेंव्हा सारखे आवडते आणि नावडते असे वर्गीकरण करण्या इतपत मित्र मैत्रिणी, ना कानावर पक्ष्यांचा किलबिलाट ना झाडांचा सळसळाट... पण हातातल्या चहाच्या कपकडे पाहून वाटते मनातल्या अठवणि चहातील साखरेप्रमाणे विरघळुन राहिल्या आहेत, त्यांचे अस्तित्व मानले तर खूप मोठे आणि नाही मानले तर क्षुल्लक आहे.
कोणाला माहीत कदाचित काही वर्षांनी अजुन एका perfectly strange ठिकाणी मी अशीच हातात चहाचा कप घेऊन आत्ताचे हे दिवस आठवत असेन, हा विचार मनात येताच हातातला तो निसटून जाणारा twilight time मी पुन्हा cherish करायला लागते, मनापासून जगायला लागते...