गाडीपुराण.... !!!

हो हो पुराणच.... ते म्हणतात ना, "घर पहावं बांधून, लग्न पहावं करून" तसाच अजुन एक.... "अमेरिकेत गाडी पाहावी घेऊन!" तर ही अशी म्हण बनवण्यामागचे कारण म्हणजे ही तिसरी गोष्ट मी अलीकडेच केली. आणि त्यामागचा अनुभव (एक नाही कमीत कमीत पन्नास अनुभव) ब्लॉगवर टाकले नसते तरच नवल....!!!

खरतरं इथे अमेरिकेत, अन्न-वस्त्र-निवारा यांच्या इतकीच महत्वाची गोष्ट आहे ती गाडी! म्हणजे आपली साधी टू व्हीलर स्कूटी वैगेरे नाही. फोर व्हीलर चकाचक. ती सुद्धा किमान माणशि एक. आता हा देश समृद्ध आहे, हे काळाले, पण म्हणून पायी चालणार्या लोकांसाठी walkways ठेउच नयेत? बर walkway नका ठेऊ, किमान बसेस ट्रेन्स तरी ठेवा महत्वाच्या ठिकाणी जायला...! ते सुद्धा नाही. बर अंतर इतकी जास्त की तसा चालत अंतर कापणे जवळ जवळ अशक्यच. पण तरी माझ्यासारख्या एखादिने केला प्रयत्न, तर गंमत सांगू, या walkways नसलेल्या रस्त्यावर जर एका कडेने चालले आणि traffic पोलीस मामांनी पहिले तर चक्क तुम्हाला walking ticket मिळू शकते!!!

म्हणजे आता चालण्यासाठी रस्ता नाही बनवायचा तुम्ही... आणि कुठलाच पर्याय नाही उरला म्हणून शेवटी आम्ही बापड्यानि चालत अंतर कापायाचा प्रयत्न केला तर वर आम्हाला त्याचा हा असा भुर्दंड! No wonder इथले सूपर हिरोज सगळीकडे उडत पोचतात, किंवा spiderman असेल तर रांगत आणि हो batman कडे स्वतःची स्पेशल गाडी आहे.

म्हणजे बघा ना एखादा सुपर हीरो त्याच्या special powers वापरुन वार्याच्या वेगाने धावत highway वर accident मधे सापडणार्या गर्लफ्रेंड ला वाचवायला जायचा आणि पोलीस मामा अर्ध्या वाटेत तिकीट घेऊन त्याची वाट पाहत असायचे. हे हॉलीवुड वाले लोक सुद्धा डोके लावून मुव्हीज काढतात. तर थोडक्यात असा आहे इथे गाडी चा महिमा!

सरते शेवटी इथे असे मामांच्या धाकाने रस्त्यावर शब्दश: पाउल न टाकता कसेबसे अडीच वर्षे निभावाल्यानंतर finally मी सुद्धा गाडी घ्यायची ठरवली.

खरतरं मुलगी असून cars चे मला वाखाणण्याजोगे वेड-बीड आहे. म्हणजे रस्त्यावर धावणार्या अगदी ९० टक्के गाड्या मी logo पाहून ओळखू शकते. कुठली Benz, कुठली Cadillac , कुठली lexus वैगेर…. Mechanism चे म्हणाल तर fromt wheel drive, back wheel drive, transmission, engine, clutch, gear इत्यादी पठडीचे शब्दही माहीत आहेत. पण बाकी luxuries, exterior, curves याचे मात्र जाम वेड आहे... त्यमुळे मी गाडी घ्यायची ठरवली ती डाइरेक्ट Audi Q2 वरुन सुरूवात झाली.

म्हणजे झाले असे की माझ्या एका बॉस कडे ही गाडी होती. मस्त shining black मोठी गाडी. कसल्या कसल्या भारी एकेक luxuries होत्या कार मधे…. झाले मग मलाही Audi च हवी! पण मित्र म्हणाले तशी तू Audi घेऊ शकतेस यात आम्हाला काही शंका नाहीये. पण सध्या जरा खिशात किती पैसे आहेत तेवढे तपासून घे. तसे वरवर हे अगदीच frank आणि friendly suggestion होते, पण मला काय कळायचे ते पुणेरी टोमणे काळाले! शेवटी पुढच्या वेळि जेंव्हा गाडी घेईन तेंव्हा Audi च घेईन अशी शपथ वगैरे घेऊन माझा गाडी पुढच्या गाडी कडे वळवली.

मग असे करता करता Audi, Lexus, BMW अश्या नावांनी सुरू झालेली ही चर्चा Honda Toyota ह्या सस्ति, मजबूत, टीकाऊ गाड्यांवर येऊन थांबली. तसा काही दिवस अंगात Volkswagon चा ताप देखील भरला होता. मी मस्तपैकी जर्मन Passat वगैरे चालवत आहे आणि इतर टीकाऊ low maintenance Japanese गाड्यांना तुच्छ वगैरे लेखत आहे, असे स्वप्न पण पडले एक दोनदा. (खरतर Japanese काय आणि German काय गाड्या सगळ्याच चांगल्या असतात, पण उगाच कधीतरी अंगात ब्रॅण्डचा ताप चढतो तो असा).

असो, तर आत्ता शोध सुरू झाला गाड्यांचा. नवीन कार घ्यायची इच्छा तर खूप होती, पण एकतर आधीच माझ्या driving skills वर अजुन प्रश्नचिन्ह आहे, त्यात इथे, म्हणजे अमेरिकेत किती वर्ष राहायचे ह्याचा काही नेम नाही. पता चला, उद्या उठून मायदेशी परत जायचे प्लॅन बनताहेत, मग बिचार्या माझ्या Beemer Audi Lexus ला बाय करताना विरह सहनच नसता झाला मुळी... :(

सरते शेवटी used cars पहायचे ठरले. Used Cars घेणार्या लोकांसाठी craigslist, cars.com Edmunds, KBB ही सगळि श्रद्धा स्थान आहेत. मग मी सुद्धा इथल्या रोज वार्या सुरू केल्या. वेग्वेग्ळ्या स्टीकी नोट्स वर लिहिलेले डीलर्स, ओनर्स यांचे पत्ते, फोन नंबर, गाडीचे मायलेज, विन नंबर्स, यांनी माझे टेबल भरून गेले. डेस्कटॉप वरही कार या टाइटल ने सुरू होणार्या डझनभर टेक्स्ट फाइल्स जमा झाल्या.

दर वीकेंड ला कार पहा, टेस्ट ड्राइव्ह घ्या, इंटीरियर- एक्सटीरियर पहा, हुड उघडून तेल पाणी चेक करा, इतके करून घरी आले की कारची हिस्टरी चेक करा, फोन वर तासभर जाणकार लोकांशी चर्चा करा, शेवटी एक किंमत ठरवून त्या गाडीवाल्याला फोन करा, त्याच्याशी घासाघिस, करा हा वीकेंड चा दिनक्रम झाला. अरे हां, घसाघिस वरुन इथली अजुन एक गमतीशीर गोष्ट आठवली. इथे आपल्यासारखे, भाजीपाला, कपडे, पुस्तके ह्यामधे bargaining होत नाही. म्हणजे तसे केलेत तर तुम्ही alien आहात अश्या पद्धतीने लोक तुमच्याकडे पाहतील...! पण गाड्यांच्या बाबतीत मात्र सार्र्रास हजार डॉलर्स पर्यंत bargaining चालते!

शेवटी हे सगळे सोपस्कार यथावकाश पार पडून गेल्या आठवड्यात finally गाडी बुक केली. Toyota Solara . Toyota आहे म्हणून स्मॉल बजेट आणि टिकाऊ तर आहेच पण मस्त टू डोर आहे, स्पोर्ट्स लुक. म्हणून मला जाम आवडली. मी पुर्वी एक डायलॉग मारायचे "आक्च्युयली गाडी विकत घेईपर्यंत सगळ्याच गाड्या आपल्या असतात पण विकत घेतल्यावर मात्र एकच आपली होते." ती आवडली, नाही आवडली काय भरोसा... पण खर सांगायचे तर गाडी अगदी फरारी किंवा मर्स नसली तरी ती माझी आहे आणि शिवाय फर्स्ट कार आहे. So shi will always be close to my heart. In short I am very happy to get my gal pal and eagerly waiting for the exciting ride!!!

On a serious note, ह्या पोस्ट मधे most important म्हणजे सगळ्यान्चे thanks ज्यांनी मला गाडी घ्यायला directly or indirectly help केली. Wish me good luck with my new car!!!

थेट मनापासून....

मराठीमधून ब्लॉग करायला लागल्यापासून, लिहिण्यात खूप मजा यायला लागली आहे. रोज संध्याकाळी घरी आल्यावर कितीही दमले असेन तरी पावले ब्लॉगकडे सहज वळतात. I mean बोटे ब्लॉग कडे सहज वळतात. हौसेने सद्ध्या ब्लॉग चे layout सुद्धा बदलले आहे, नवीन रंग, नवीन पोस्ट खूप excitement आहे. कविता आणि कथा लिहून सुद्धा झाल्या इथे, पण खर सांगायचं तर blogging म्हटलं की ते थेट मनापासून यायला हव, त्याशिवाय मजा नाही रहात त्याची. म्हणूनच आज ही पोस्ट.
थेट मनापासून....

गेले काही दिवस भरपूर काम सुरू आहे. ऑफीस मधे तर असतेच पण घरी सुद्धा आहे. खरतर, इतकी कामाने overloaded झाली असताना मी वैतागायला हविये. येणार्‍या जाणार्‍या प्रत्येकाच्या डोक्यावर खापर फोडून मोकळि व्हायला हविये. घरी येऊन दमुन भगुन कधी एकदा झोपतेय असे dialogue ऐकवायला हवेत. पण To be honest, मी आजिबात वैतागली नाहीए. In fact मी ही माझी अखंड energy आणि stamina भरपूर enjoy करतिये. आळस करत दिवस घालवावा असा कधी कधी सकाळी ५ मिनिट वाटते खरे... पण ते काही वेळच. बाकी एकदा दिवस सुरू झाला की ती धावपळ, लगबग खूप मस्त वाटते, सगळे manage करताना आपला प्रत्येक दिवस खरच किती worthwhile आहे याची जाणीव होते. आणि विशेष म्हणजे ही कसरत जमतेय हे बघून स्वत:चेच कौतुक वाटते. सो थ्री चियर्स फॉर ऑल वर्किंग डेज़!!!

By the way, blogging चा उपक्रम जोरात सुरू आहे, पण ह्याचे main aim, सगळ्या मित्र - मैत्रिणींशी connect होणे आहे.. सो मी तुमच्या comments ची आणि suggestions ची खूप वाट पहात आहे. सध्या तुम्ही सुद्धा माझ्यासारखेच busy असाल असे समजून तुम्हाला benefit of doubt दिले. पण वेळ मिळेल तेंव्हा नक्की comments लिहा. मी वाट बघतिये.

मनातले चांदणे - २

चार साडेचार वाजले असतील. पावसाची रिमझिम आता कमी झाली होती. मी चहाचा कप हातात घेऊन नवीनच लिहायला घेतलेल्या स्क्रिप्ट वर डोके लावत होतो. इतक्यात दारात सदु उभा राहिला. "साहेब आत येऊ? " यावेळचा सदु मला सकाळच्या सदु पेक्षा अगदी निराळच वाटला. गणवेषात अगदी टापटिपीत हातात एक कापडाची पिशवी घेऊन एखाद्या शाळकरी मुलासारखा मी त्याला आत बोलावले. त्याच्या चेहेर्‍यावर आज वेगळिच चमक दिसत होती. कुतुहलाने तो माझ्या खोलीच्या एका कोपर्‍यात, ज्याला मी स्टडी म्हणतो, तिथे कपाटात रचून ठेवलेली पुस्तके न्याहळत होता. मी माझा कागदांचा पसारा आवरला. आणि पाणी देत त्याला म्हटले, " अरे सदु, शाळेतुन इथेच आलास की काय?" " हो साहेब, शाळेतुन सरळ इथेच आलो, मी इथल्या जवळच्या सारकारी शाळेत जातो, घर दूर आहे, त्यामुळे तिकडे न जाता सरळ इथेच आलो. साहेब तुम्ही पुस्तके लिहिता? " सदु सकाळ सारखेच भरभरून बोलत होता. " नाही रे, मी पटकथा लिहितो. पण मला वाचनाची आवड आहे, म्हणून ही पुस्तके" " बोल तुला कोणती पुस्तके वाचायला आवडतात? "

"साहेब मी अत्तापर्यंत फक्त शाळेच्या वाचनालयात मिळणारी पुस्तके वाचली आहेत, काही कथा संग्रह, काही कादंबर्‍या, एक दोन कविता संग्रह सुद्धा... पण साहेब आमच्या शाळेतील वाचनालयात फारशी पुस्तके उपलब्ध नाहीत, सरकार कडून वर्षभरात ठराविक निधी मिळ्तो, त्यातून जी पुस्तके येतात, ती सर्व मुलांना दर आठवड्यात वाटण्यात येतात " काही मुले पुस्तके परत करतात काही करत नाहीत, काही पुस्तके नीट हाताळली जात नाहीत, त्यामुळे फारच कमी पुस्तके वाचायला मिळतात" त्याच्या वाचण्याच्या छन्दाचे मला कौतुक वाटले. मी त्याला गडकार्यांचे गोकुळ वाचण्यास दिले. त्या पुस्तकावरील मुखपृष्ठ पाहून त्याचे डोळे लुकलुकले. "साहेब ह्या पुस्तकातील काही भाग अम्हाला बालभारती मधे शिकण्यास होता" सदु उत्साहाने म्हणाला. " साहेब हे पुस्तक वाचायला दिल्याबद्दल धन्यवाद. साहेब मी पुस्तक कधी परत करू? म्हणजे साहेब तुमची हरकत नसेल तर, मी माझ्यासोबत पुस्तक वाचायला घेऊन जाउ शकतो का? " त्याला मी हसत हसत म्हणालो, " अरे खुशाल घेऊन जा... मी ही सगळि पुस्तके वाचली आहेत, त्यामुळे तू घेऊन गेलास तरी चालेल. तुझी वाचून झाली की पेपर वाटायला येताना परत आणलिस तरी हरकत नाही. सदु त्या पुस्तका कडे कौतुकाने पाहत होता. मी दोघांसाठी चहा टाकला, तो अजुन बराच वेळ मला माझ्याकडच्या इतर पुस्ताकांबद्दल विचारात राहिला.

दोन दिवसांनी सदु सकाळी पेपर सोबत पुस्तकही घेऊन आला. मी घाईत असल्याने पेपर व पुस्तक टेबल वर ठेऊन जायला सांगितले. संध्याकाळी आल्यावर टेबल वर पडलेले पुस्तक पहिले तेंव्हा दिसले की सदु ने त्यावर हिरव्या रंगाच्या जाड कागदाचे कव्हर घातले आहे आणि वर निळया शाईने वळणदार अक्षरात पुस्तकाचे नाव आणि लेखकाचे नाव लिहिले आहे.

त्यानंतर ४ -५ महिने सदु माझ्याकडून नवीन नवीन पुस्तके घेऊन जायला आला. दर वेळि पुस्तक वाचून झाल्यावर तो न विसरता त्यावर वेगवेगळ्या रंगाचे कव्हर घालून त्यावर पुस्तकाचे नाव लिहून परत देत असे. दरम्यान माझ्याकडे कामाचा व्याप बराच. त्यामुळे गेल्या सहा महिन्यात आमची भेट फक्त पुस्तक देण्या घेण्याच्या निमित्ताने होत राहिली.

अश्याच एका सकाळी मी पेपर येण्याची वाट पहात असताना एक नवीनच मुलगा पेपर वाटायला आला. मी त्याला विचारले. काय रे तो दुसरा मुलगा सदु, सदाशीव तो कुठे आहे? आजारी आहे का? तो मुलगा काही ना कळल्यागत माझ्याकडे पहात म्हणाला " साहब हमको कुछ पता नही, हम इधर नया आया है, पेहले हम दुसरे दुकान में काम करता था, अभी इधर शुरू किया है" त्या मुलाला सदु बद्दल काहीच माहीत नव्हते.

त्यानंतर बरेच दिवस मे सदु ची वाट पहिली पण तो आलाच नाही. पेपर एजन्सी मधे चौकशी केली तेंव्हा काळाले तो अचानक एक दिवशी कामावर येईनासा झाला. त्याची शाळा कोणती हे सुद्धा मला नक्की माहीत नव्हते. त्यामुळे तिथे चौकशी करणेही शक्य नव्हते. शेवटी माझ्या इतर कामाच्या गडबडीत, सदुचा विषय कायमचा मागे पडला. केंव्हातरी कपाटातिल पुस्तकात काही वेगवेगळ्या रंगाच्या कव्हर मधील पुस्तके पाहून मात्र त्याची आठवण यायची.

या गोष्टीला सुमारे पाच सहा वर्ष झाली असतील, एका अंतरशालेय निबंध स्पर्धेसाठी मी परीक्षक म्हणून गेलो होतो. त्या स्पर्धेचे वैशिष्ट्य असे की निबंधाचे कोणतेही विषय न देता आपल्या आवडत्या विषयावर निबंध लिहायचे होते. त्या स्पर्धेतील काही निबंध खरोखर सुरेख होते. प्रवासवर्णाने, आवडता खेळ, सूर्योदय सूर्यास्त अश्या विवध विषयावर मुलांनी निबंध लिहिले होते.

परीक्षण करताना एक निबंध हातात आला. त्यात कोकणातील एका सुंदर चांदण्या रात्रीचे वर्णन केले होते, कोकणातील छोटेखानी कौलारू घर, घराच्या समोरील अंगणात तुळशिचे वृंदावन, अंगणातील झोपाळ्यवर बसलेले मुलाचे वडील, आपल्या १० - १२ वर्षाच्या मुलांना पुस्तकातील एक कथा वाचून दाखवत आहेत, असे वर्णन होते. त्या निबंधातील एक एक ओळ वाचून स्पर्धकाला भेटण्याची माझी उत्सुकता वाढतच गेली, त्याचे वळणदार अक्षर परिचयचे वाटले. आयोजकांना स्पर्धकाचे नाव विचारले तेंव्हा त्यांनी सांगितले सदाशीव गाकवाड.

सदुला मी सुमारे सहा वर्षानी भेटत होतो, यंदा तो मॅट्रिकच्या परीक्षेला बसणार होता. त्याच्याशी बोलल्यावर काळाले की तो अनाथ होता. आई वडील यांना त्याने कधीच पाहिले नव्हते. स्वतःच्या बळावर नोकरी करून शिक्षण पूर्ण करण्याची त्याची महत्वाकांक्षा होती. त्यासाठी तो पेपर वाटण्याचे काम करीत होता.

अचानक आश्रामाच्या जगेविषयी वाद झाल्याने तेथील सर्वांना नवीन जागेत स्थलांतरित व्हावे लागले. त्यमुळे त्याचे पेपर वाटण्याचे काम सुटले. शाळाहि बदलली. त्याच्या पुस्तकाबद्दल च्या अवडीमुळे आणि आपुलकीमुळे त्याला एका लायब्ररी मधे काम मिळाले. सध्या तो लायब्ररी मधे पुस्तकांची सफाई ठेवण्याचे व जुन्या पुस्तकांना कव्हर घालण्याचे काम करीत होता. यावर्षी असलेल्या दहावीच्या परीक्षेबद्दल तो नेहमीसारखेच भरभरून बोलत होता. बोलताना त्याच्या निबंधात व्यक्त झालेले मनातले चांदणे त्याच्या चेहेर्‍यावरही पसरले होते.

- समाप्त.

मनातले चांदणे - १

( लहानपणी बालभारातीच्या पुस्तकात अभ्यासाला असलेला माझा आवडता धडा इथे स्वतःच्या शब्दात मांडत आहे. मूळ लेखकाची माफी मागून. काही संदर्भ चुकण्यचि शक्यता आहे. पण या धड्याचे शीर्षक मला आजही स्वच्छ अठवते. मला वाटते आपल्या प्रत्येकाच्याच मनात एक चांदणे असते, गरज असते फक्त ते शोधण्याची. आज सहजच हे लिहिण्याची इच्छा झाली... म्हणून लिहिले. )




सोमवारची सकाळ, नवीन अठवडा सुरू झाला की सगळ्या लोकांची लगबग सुरू होते. तशी आमच्या बिल्डिंग मधे बहुतेक सगळे फॅमिलीवाले. त्यामुळे प्रत्येकाची सकाळची सात चाळीस ची लोकल पकडायची गडबड, मुलांची शाळेत जायची तयारी, थोडक्यात काय एखाद्या टिपिकल सोमवार सकाळसारखी आजचीही. पण नुकताच मान्सून सुरू झालेला, पाउसाची रात्रिपसूनच संततधार लागलेली.. नोकरदार लोकांना ह्या पावसाचे भलते संकट वाटते, आता लोकल पकडायला उशीर, ऑफीस मधे पोचायला उशीर, सगळी कामे खोळंबणार असे विचार थोड्याफार फरकाने प्रत्येकाच्या डोक्यात सकाळपासून सुरू असतात.

मला मात्र ह्या सगळ्याशी काही घेणे देणे नसते... आधीच मी बॅचलर, एकटा राहणारा, आणि त्यात स्क्रिप्ट राइटिंग एजेन्सी सारख्या फील्ड मधे काम करणारा, त्यामुळे वेळेचे फारसे वावडे मला कधीच नसते... बहुतेक वेळा मी उठेन तेंव्हा दिवस आणि झोपेन तेंव्हा रात्र असाच माझा दिनक्रम... त्यात मुंबई चा पाउस म्हणजे माझा जाम आवडीचा, मस्त चहा बनवून, खिडकीत पावसाचे तुषार अंगावर घेत येणार्‍या जाणार्‍याची लगबग बघत राहणे माझे आवडते काम. ते मे अगदी मनापासून करत असतो.

इतक्यात शेजारच्या देशपांडे काकुंचे अगदी तार स्वरात वैतागून तावातावाने बोलणे माझ्या कानावर पाडते, " क्या भैीय्या ये कोई टाइम हुआ आने का, हमने पेपर क्‍यू लागया है, ताकि सुबाह सारी गडबड शुरू होने से पेहले हम पेपर पढ सके, और तुम पपेरवाले अपानाही घर समझ के कभी भी पेपर वाटणे चले आते हो... अभी ये रोज का हो गया है तुम्हारा, आज साहब को तुम्हारी वजह से ऑफीस जाने को लेट होगा तो मैं तुम्हारी इस महिने की पेपर बिल से पैसे काट लुंगी, समझ गये ना" देशपांडे काकुंची ही गाडी कुठून सुरू होऊन कुठे थांबली हे ऐकून मला काही हसू अवरत नाही. पेपरवाल्या त्या पोराचा जीव मात्रा अगदी एव्हडासा झालेला असतो. तो काकुंची बोलणी निमूटपणे ऐकून घेतो, काकू त्याला बिललची धमकी देऊन जवळ जवळ त्याच्या तोंडावरच दार आपटतात.

तो पुढे माझ्या घरी येऊन पेपर चे बिंडोळे माझ्या हातात देतो. त्याच्या चेहेर्‍या वरुन स्पष्ट दिसत असते की देशपांडे काकुंच्या धमकीतून तो अजूनही सावरलेला नाही, पावसाने त्याला कधीच नखशिखांत भिजवलेले असते, एका हातात प्लास्टिकमधे गुंडालालेला वर्तमानपत्राचा गट्ठा सावरत दुसर्‍या हताने तो चेहेर्‍यावर पडणारे पाणी पुसत असतो. माझ्या हातात पेपर चे बिंडोळे देताना उगीचच कसनुसा हसतो. त्याच्या त्या हसण्याने चेहेर्‍यावरचे कारुण्य अधिकच गडद होते. मी त्याला विचारतो " भैीय्या चाय लोगे" तो हसतो, म्हणतो " नको साहेब अजुन बरीच वर्तमानपत्रे वाटायची आहेत, लोक खोळंबलेले असतील, आज पावसामुळे निघायला थोडासा उशिराच झाला, आणि पलीकडच्या गल्लीत पेपर वाटणारा मुलगा आजारी आहे, त्यमुळे त्याचे कामही मलाच करायचे आहे". त्याचे इतके छान मराठी ऐकून थोडा वेळापूर्वीचे देशपांडे काकुंचे मोडके तोडके हिंदी मला आठवते, मी त्याला थांबायचा आग्रह करत नाही.

पण त्याला काहीतरी विचारायचे असते, " साहेब, माझे नाव सदू, पूर्ण नाव सदाशीव गायकवाड, साहेब मी तुमच्या घरी बरीच पुस्तके पहिली आहेत, बरेचदा लायब्ररिची पुस्तके, मासिके सुद्धा वाटली आहेत. साहेब मला सुद्धा वाचनाची खूप आवड आहे, तुम्ही मला वाचायला पुस्तके द्याल? पेपर एजन्सी चा मालक आम्हाला वर्तमानपत्र, मासिके कव्हर करून वाटायला देतो, त्यमुळे ती वाचता येत नाहीत... मी त्याला अनेकदा विनंती केली पण तो म्हणतो भरपूर मेहनत करून सूपरवाईजर हो, मग दुकानावर बस आणि हवी तेव्हडी पुस्तके वाच, पण साहेब मी तर तिथे नवीन आहे, मला सूपरवाईजर व्हायला अजुन किमान 2-3 वर्ष लागतील. साहेब तुम्ही खूप पुस्तके वाचता. मला सुद्धा वाचायला शिकवाल चांगली पुस्तके?" अगदी एका दमात सगळं काही बोलल्यावर सदु थांबला. चेहेर्‍यावरचे पाणी पुसत तो पुन्हा वर्तमानपत्राची बॅग सावरू लागला.मी त्याला म्हणालो, " सदु मी तुला नक्की पुस्तके वाचायला देईन, पण आत्ता तुला पेपर वाटायला उशीर होतोय ना, तू आज संध्याकाळी घरी ये.. मग आपण बोलूया. माझे हे उत्तर ऐकून सदु आनंदाने पण थोड्या लगबगितच पेपर वाटायला पळाला.