मराठीमधून ब्लॉग करायला लागल्यापासून, लिहिण्यात खूप मजा यायला लागली आहे. रोज संध्याकाळी घरी आल्यावर कितीही दमले असेन तरी पावले ब्लॉगकडे सहज वळतात. I mean बोटे ब्लॉग कडे सहज वळतात. हौसेने सद्ध्या ब्लॉग चे layout सुद्धा बदलले आहे, नवीन रंग, नवीन पोस्ट खूप excitement आहे. कविता आणि कथा लिहून सुद्धा झाल्या इथे, पण खर सांगायचं तर blogging म्हटलं की ते थेट मनापासून यायला हव, त्याशिवाय मजा नाही रहात त्याची. म्हणूनच आज ही पोस्ट.
थेट मनापासून....
गेले काही दिवस भरपूर काम सुरू आहे. ऑफीस मधे तर असतेच पण घरी सुद्धा आहे. खरतर, इतकी कामाने overloaded झाली असताना मी वैतागायला हविये. येणार्या जाणार्या प्रत्येकाच्या डोक्यावर खापर फोडून मोकळि व्हायला हविये. घरी येऊन दमुन भगुन कधी एकदा झोपतेय असे dialogue ऐकवायला हवेत. पण To be honest, मी आजिबात वैतागली नाहीए. In fact मी ही माझी अखंड energy आणि stamina भरपूर enjoy करतिये. आळस करत दिवस घालवावा असा कधी कधी सकाळी ५ मिनिट वाटते खरे... पण ते काही वेळच. बाकी एकदा दिवस सुरू झाला की ती धावपळ, लगबग खूप मस्त वाटते, सगळे manage करताना आपला प्रत्येक दिवस खरच किती worthwhile आहे याची जाणीव होते. आणि विशेष म्हणजे ही कसरत जमतेय हे बघून स्वत:चेच कौतुक वाटते. सो थ्री चियर्स फॉर ऑल वर्किंग डेज़!!!
By the way, blogging चा उपक्रम जोरात सुरू आहे, पण ह्याचे main aim, सगळ्या मित्र - मैत्रिणींशी connect होणे आहे.. सो मी तुमच्या comments ची आणि suggestions ची खूप वाट पहात आहे. सध्या तुम्ही सुद्धा माझ्यासारखेच busy असाल असे समजून तुम्हाला benefit of doubt दिले. पण वेळ मिळेल तेंव्हा नक्की comments लिहा. मी वाट बघतिये.
sahie.....maja aali.... :)
ReplyDeleteOh.. khup diwasani blog la visit kele.. aani badalalele rup baghun dole dipale :P
ReplyDeleteJokes apart manapasun thet baryach goshti aalya aahet.. mast aahe ekdum.. chokhandal wachakansathi mast aahe.. nice and hope I also get some inspiration from uar busy schedule and do something nice.. ;-) worth visiting sahajmanatal :)