मनातले चांदणे - २

चार साडेचार वाजले असतील. पावसाची रिमझिम आता कमी झाली होती. मी चहाचा कप हातात घेऊन नवीनच लिहायला घेतलेल्या स्क्रिप्ट वर डोके लावत होतो. इतक्यात दारात सदु उभा राहिला. "साहेब आत येऊ? " यावेळचा सदु मला सकाळच्या सदु पेक्षा अगदी निराळच वाटला. गणवेषात अगदी टापटिपीत हातात एक कापडाची पिशवी घेऊन एखाद्या शाळकरी मुलासारखा मी त्याला आत बोलावले. त्याच्या चेहेर्‍यावर आज वेगळिच चमक दिसत होती. कुतुहलाने तो माझ्या खोलीच्या एका कोपर्‍यात, ज्याला मी स्टडी म्हणतो, तिथे कपाटात रचून ठेवलेली पुस्तके न्याहळत होता. मी माझा कागदांचा पसारा आवरला. आणि पाणी देत त्याला म्हटले, " अरे सदु, शाळेतुन इथेच आलास की काय?" " हो साहेब, शाळेतुन सरळ इथेच आलो, मी इथल्या जवळच्या सारकारी शाळेत जातो, घर दूर आहे, त्यामुळे तिकडे न जाता सरळ इथेच आलो. साहेब तुम्ही पुस्तके लिहिता? " सदु सकाळ सारखेच भरभरून बोलत होता. " नाही रे, मी पटकथा लिहितो. पण मला वाचनाची आवड आहे, म्हणून ही पुस्तके" " बोल तुला कोणती पुस्तके वाचायला आवडतात? "

"साहेब मी अत्तापर्यंत फक्त शाळेच्या वाचनालयात मिळणारी पुस्तके वाचली आहेत, काही कथा संग्रह, काही कादंबर्‍या, एक दोन कविता संग्रह सुद्धा... पण साहेब आमच्या शाळेतील वाचनालयात फारशी पुस्तके उपलब्ध नाहीत, सरकार कडून वर्षभरात ठराविक निधी मिळ्तो, त्यातून जी पुस्तके येतात, ती सर्व मुलांना दर आठवड्यात वाटण्यात येतात " काही मुले पुस्तके परत करतात काही करत नाहीत, काही पुस्तके नीट हाताळली जात नाहीत, त्यामुळे फारच कमी पुस्तके वाचायला मिळतात" त्याच्या वाचण्याच्या छन्दाचे मला कौतुक वाटले. मी त्याला गडकार्यांचे गोकुळ वाचण्यास दिले. त्या पुस्तकावरील मुखपृष्ठ पाहून त्याचे डोळे लुकलुकले. "साहेब ह्या पुस्तकातील काही भाग अम्हाला बालभारती मधे शिकण्यास होता" सदु उत्साहाने म्हणाला. " साहेब हे पुस्तक वाचायला दिल्याबद्दल धन्यवाद. साहेब मी पुस्तक कधी परत करू? म्हणजे साहेब तुमची हरकत नसेल तर, मी माझ्यासोबत पुस्तक वाचायला घेऊन जाउ शकतो का? " त्याला मी हसत हसत म्हणालो, " अरे खुशाल घेऊन जा... मी ही सगळि पुस्तके वाचली आहेत, त्यामुळे तू घेऊन गेलास तरी चालेल. तुझी वाचून झाली की पेपर वाटायला येताना परत आणलिस तरी हरकत नाही. सदु त्या पुस्तका कडे कौतुकाने पाहत होता. मी दोघांसाठी चहा टाकला, तो अजुन बराच वेळ मला माझ्याकडच्या इतर पुस्ताकांबद्दल विचारात राहिला.

दोन दिवसांनी सदु सकाळी पेपर सोबत पुस्तकही घेऊन आला. मी घाईत असल्याने पेपर व पुस्तक टेबल वर ठेऊन जायला सांगितले. संध्याकाळी आल्यावर टेबल वर पडलेले पुस्तक पहिले तेंव्हा दिसले की सदु ने त्यावर हिरव्या रंगाच्या जाड कागदाचे कव्हर घातले आहे आणि वर निळया शाईने वळणदार अक्षरात पुस्तकाचे नाव आणि लेखकाचे नाव लिहिले आहे.

त्यानंतर ४ -५ महिने सदु माझ्याकडून नवीन नवीन पुस्तके घेऊन जायला आला. दर वेळि पुस्तक वाचून झाल्यावर तो न विसरता त्यावर वेगवेगळ्या रंगाचे कव्हर घालून त्यावर पुस्तकाचे नाव लिहून परत देत असे. दरम्यान माझ्याकडे कामाचा व्याप बराच. त्यामुळे गेल्या सहा महिन्यात आमची भेट फक्त पुस्तक देण्या घेण्याच्या निमित्ताने होत राहिली.

अश्याच एका सकाळी मी पेपर येण्याची वाट पहात असताना एक नवीनच मुलगा पेपर वाटायला आला. मी त्याला विचारले. काय रे तो दुसरा मुलगा सदु, सदाशीव तो कुठे आहे? आजारी आहे का? तो मुलगा काही ना कळल्यागत माझ्याकडे पहात म्हणाला " साहब हमको कुछ पता नही, हम इधर नया आया है, पेहले हम दुसरे दुकान में काम करता था, अभी इधर शुरू किया है" त्या मुलाला सदु बद्दल काहीच माहीत नव्हते.

त्यानंतर बरेच दिवस मे सदु ची वाट पहिली पण तो आलाच नाही. पेपर एजन्सी मधे चौकशी केली तेंव्हा काळाले तो अचानक एक दिवशी कामावर येईनासा झाला. त्याची शाळा कोणती हे सुद्धा मला नक्की माहीत नव्हते. त्यामुळे तिथे चौकशी करणेही शक्य नव्हते. शेवटी माझ्या इतर कामाच्या गडबडीत, सदुचा विषय कायमचा मागे पडला. केंव्हातरी कपाटातिल पुस्तकात काही वेगवेगळ्या रंगाच्या कव्हर मधील पुस्तके पाहून मात्र त्याची आठवण यायची.

या गोष्टीला सुमारे पाच सहा वर्ष झाली असतील, एका अंतरशालेय निबंध स्पर्धेसाठी मी परीक्षक म्हणून गेलो होतो. त्या स्पर्धेचे वैशिष्ट्य असे की निबंधाचे कोणतेही विषय न देता आपल्या आवडत्या विषयावर निबंध लिहायचे होते. त्या स्पर्धेतील काही निबंध खरोखर सुरेख होते. प्रवासवर्णाने, आवडता खेळ, सूर्योदय सूर्यास्त अश्या विवध विषयावर मुलांनी निबंध लिहिले होते.

परीक्षण करताना एक निबंध हातात आला. त्यात कोकणातील एका सुंदर चांदण्या रात्रीचे वर्णन केले होते, कोकणातील छोटेखानी कौलारू घर, घराच्या समोरील अंगणात तुळशिचे वृंदावन, अंगणातील झोपाळ्यवर बसलेले मुलाचे वडील, आपल्या १० - १२ वर्षाच्या मुलांना पुस्तकातील एक कथा वाचून दाखवत आहेत, असे वर्णन होते. त्या निबंधातील एक एक ओळ वाचून स्पर्धकाला भेटण्याची माझी उत्सुकता वाढतच गेली, त्याचे वळणदार अक्षर परिचयचे वाटले. आयोजकांना स्पर्धकाचे नाव विचारले तेंव्हा त्यांनी सांगितले सदाशीव गाकवाड.

सदुला मी सुमारे सहा वर्षानी भेटत होतो, यंदा तो मॅट्रिकच्या परीक्षेला बसणार होता. त्याच्याशी बोलल्यावर काळाले की तो अनाथ होता. आई वडील यांना त्याने कधीच पाहिले नव्हते. स्वतःच्या बळावर नोकरी करून शिक्षण पूर्ण करण्याची त्याची महत्वाकांक्षा होती. त्यासाठी तो पेपर वाटण्याचे काम करीत होता.

अचानक आश्रामाच्या जगेविषयी वाद झाल्याने तेथील सर्वांना नवीन जागेत स्थलांतरित व्हावे लागले. त्यमुळे त्याचे पेपर वाटण्याचे काम सुटले. शाळाहि बदलली. त्याच्या पुस्तकाबद्दल च्या अवडीमुळे आणि आपुलकीमुळे त्याला एका लायब्ररी मधे काम मिळाले. सध्या तो लायब्ररी मधे पुस्तकांची सफाई ठेवण्याचे व जुन्या पुस्तकांना कव्हर घालण्याचे काम करीत होता. यावर्षी असलेल्या दहावीच्या परीक्षेबद्दल तो नेहमीसारखेच भरभरून बोलत होता. बोलताना त्याच्या निबंधात व्यक्त झालेले मनातले चांदणे त्याच्या चेहेर्‍यावरही पसरले होते.

- समाप्त.

10 comments:

  1. Manatale chandane khup matured aahe ase janawate.. mastch.. mhaanje eka goshtiche asehi interpretation hou shakte baghun mast watale.. chan ch aahe.. too gud :)

    ReplyDelete
  2. Thanks.
    Khup Chhan prayatn. Pan thodi chuk jhaleli aahe.

    1)Sadu anath navhata.
    2) Kokanatlya chandanyache varnan lekhakane sadula pahilech kelele hote.
    3)Madheel thoda part apurn aahe. Jase Saduchya vadilanche nidhan jhalyananater tyachi aai aajari padte aani chotya bhavandachi jababdari saduchya khandyavar yete. Tyamule to shala sodto ani divsa kaam karto va ratra shala join karto.

    ReplyDelete
  3. kup changla lesson ahe pan ya made thode vegle story dili ahe sudu chya evji ballu ahe and to tyachya family sathi hard work karat hota ase vachale hote 7th standard la

    ReplyDelete
  4. त्याचे नाव सदू नसून बल्लू/बल्लवकुमार असे होते

    ReplyDelete
  5. कोणाकडे जर ही मूळ कथा असेल तर मला सेंड कराल का? thunderpilot09@gmail.com

    ReplyDelete
    Replies
    1. मला पण हवी आहे ही मूळ कथा...

      Delete
  6. मूळ कथेतील मुलाचे नाव बल्लू उर्फ बल्लव कदम असे होते सदु नाही

    ReplyDelete
  7. Mazya kade aahe real book 7972478283
    Call

    ReplyDelete
  8. Mazya kade aahe book 7972478283 pahije asel tr call

    ReplyDelete