Restaurent Review - विष्णुजी कि रसोई


खरंतर ही पोस्ट लिहायला जरा उशीरच झालाय, restaurent चा review तिथल्या जेवणाची चव जिभेवर  असतानाच लिहिला तर त्याला खरा न्याय मिळतो. असो, ‘देर आये पर दुरुस्त आये’ म्हणून लिहायला सुरुवात करते.


एका अतिशय बिझी वीकेंड च्या संध्याकाळी आमच्या १० लोकांच्या मोठ्या कुटुंबाचा जेवणाचा बेत ठरला. वेगवेगळ्या वयोगटातील आणि अवडीनिवाडी असणारे सगळेजण म्हणून ‘विष्णुजी कि रसोई’ ची निवड झाली. तिथे पोचलो तेंव्हा ambiance ने निश्चितच लक्ष वेधून घेतले. एकंदर वातावरणाला आणि जेवणाला गावाकडचा फील देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय हे बघताक्षणीच लक्षात आले.


इथली जेवणाची पद्धत buffet प्रकारात मोडते. आधीच पैसे भरून टोकन घेतले आणि आत गेलो. इथे general waiting staff ऐवजी facilitators होते ज्यांनी आम्हाला वेगवेगळ्या विभागांची माहिती करून दिली. starter म्हणून आलेले सूप चविष्ट होते. मुख्य आकर्षण म्हणजे थालीपीठ, झुणका - भाकरी आवडले. मला प्रचंड आवडणार पंचामृत बघून मस्त वाटले. एकुणात चवीच्या बाबतीत कुठे कमतरता नव्हती.


मात्र, मुख्य उणीव जाणवली ती नियोजनाची. हॉटेलच्या एका भागात बर्थडे पार्टी सुरु होती जिचा सगळा आवाज आणि गोंगाट इतरत्र जाणवत होता. पार्टी साठी स्वतंत्र विभाग असणे आवशयक वाटले. नाही म्हणायला background ला music सुरु होते, पण गाण्यांचे selection  अगदीच सुमार वाटले.


तसेच गर्दीतून वाट काढून कसेबसे buffet पर्यंत पोचायचे आणि एखादा पदार्थ वाढून आणायचा, त्यासाठी दोन चार खेपा करायच्या हा एकंदर अनुभव फारसा रुचला नाही. किंबहुना एखाद्या लग्नाच्या dinning मध्ये जेवल्यासारखे वाटले. पदार्थ आणण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कसरतीमुळे सहभोजनाचा आनंद अजिबात घेता आला नाही. तसेच बर्यापैकी expensive थाळी असूनही पुरणपोळी साठी वेगळी किंमत मोजायची हे कुठेतरी खटकले.


एकूणच चांगली संकल्पना पण नियोजनाचा अभाव असे ‘विष्णुजी कि रसोई’ बद्दल थोडक्यात सांगता येईल.


नाव - विष्णुजी कि रसोई
लोकेशन - एरंडवणे पुणे
खाद्यप्रकार - महाराष्ट्रीयन, फ्युजन
रेटिंग - ३/५