नाही-नाही, लांबी रुंदी खोली त्यातली खोली नाही, इंग्लीश मधे रूम म्हणतात ना त्यातली खोली. मला लहानपणीपासून बनवायची आहे एक पुस्तकांची खोली. मी नेहमीच तीन चार खोल्यांच्या छोट्या घरात राहिली आहे, पण आपल्या घरी एक छानशी स्टडी रूम असावी असे नेहमी वाटते.
तशी मी वाचन वेडी असण्यापेक्षा लेखन वेडीच जास्त आहे. खरतर माझ्या स्वभवमुळेच. इतरांचे ऐकण्यापेक्षा स्वतःचेच ऐकवणे जास्त प्रिय आहे मला. पण तरीसुद्धा मला एक घरातली ईवलिशी जागा ठेवायची आहे पुस्तकांसाठी.
माझ्या स्वप्नातली ही पुस्तकांची खोली खूप शांत ठिकाणी असावी, खोलीच्या खिडकीला किंवा balcony ला लागून घराबाहेरच्या बागीच्यातली जाई ची वेल असावी. एखाद्या वृक्षाच्या सावलीने या खोलीतला काही भाग पंखाखाली घ्यावा. इथे एका बाजूला पुस्तकांचे कपाट असावे आणि दुसरीकडे मस्त भारतीय बैठकीच्या style चा बिछाना. कपाटामधे काही मोठ्या लेखकांची पुस्तके तर काही अपरिचित लेखकांची पण दुर्मिळ पुस्तके असावित, सारी पुस्तके सूबकापणे माडून ठेवलेली. प्रत्येक पुस्तकावर स्वत: हाताने cover करावे, आणि वळणदार अक्षरात नाव लिहावे. रोज रात्री हाताला लागेल ते पुस्तक काढून वाचता येईल अशी ती मांडणी असावी.
खोलीच्या एका कोपर्यात एक मस्त छोटासा CD Player असावा, आणि सोबत जुन्या नव्या गाण्यांच्या Cassettes आणि CDs, non-pirated. दिवसभरचे काम आटोपून कधीतरी रात्री या खोलीत निवांत गाणी ऐकत अन् पुस्तक वाचत पडावे. एखाद्या रविवारी, जेवण केल्यावर सारी दुपार मस्त स्टडी रूम मधे घालवावी.
पुस्तक आणि गाण्यांच्या collection शिवाय इथे पेन, पेन्सिल, पेन्स्टँड, बुकमर्क्स, अश्या internet आणि laptop मुळे दुर्लभ झालेल्या गोष्टींचेही collection असावे. कधीतरी आवड म्हणून वाजवायला घेतलेली किंवा अर्धवट शिकलेली violin, guitar सुद्धा याच खोलीत आपली वाट पहात असावी.
लहानपणी वाचले होते डॉ. आंबेडकरांचे पुस्तकाचे व्यसन, एखादा संदर्भ नेमका कुठल्या पुस्तकातील आहे आणि ते पुस्तक library मधे कोणत्या कप्प्यात आणि कितव्या क्रमान्काला ठेवले आहे इतकी माहिती त्यांना पुस्तकाबद्दल असायची. वाचनाचे इतके व्यसन लागेल की नाही माहीत नाही, पण मनाच्या आणि घरच्या छोट्याश्या कप्प्यात पुस्तकांना एक अढळ्स्थान द्यायला मात्र मला नक्कीच आवडेल.