एक आहे पाउस माझ्या मनात साठवलेला
तुझ्यासाठी बरसलेला तुझ्याविन आसुसलेला
एक आहे पिंपळपान माझ्या वहित ठेवलेले
ज़ाळिदार नक्षीसारखे मनावर कोरलेले
एक आहे रात्र तुझ्यासाठी जागलेली
चांदण्यांचे कवडसे मनात शिंपत गेलेली
एक आहे इंद्रधनू श्रावणात प्रकटलेला
सप्तरंग सप्तसूर तृप्त पिऊन घेतलेला
एक आहे तुझा शब्द ओठांवर आलेला
लिहिता लिहिता माझी कविता बनून उमटलेला