......

भावनेच्या हिंदोळ्यावर शब्द जणू पाचोळ्यासारखे तरंगत गेले, वाट फुटले तिथे भिरभिरत राहीले. शोधत राहीले गर्दीतला एखादा ओळखीचा चेहरा, रानवाटेवर उमललेला चाफा, शिशिरातले चांदणे, आषढातील कृष्णमेघ, काहीतरी कुठेतरी गवसेल ह्या खुळ्या अशेने...

कधी एकटे तर कधी क्षणभराच्या सोबतीने चालत राहीले.

ज्याची सोबत कधीच सुटत नाही आणि सोडवतही नाही ते असते एकटेपण, कधी जनातले, कधी चित्तातले, कधी जपलेले, तर कधी स्वतःवरच ओवाळुन टाकलेले... कधी-कधी उमजलेले बरेचदा न समजलेले. शब्दही एकटेपणाच्या सोबतीने तरंगत राहीले. क्षणभरच विसावा शोधण्यासाठी कदाचित...

पण विखरत जाणार्‍या ह्या शब्दांना खरच हवा होता का विसावा?
की वार्‍याबरोबर दरवळणार्‍या गंधासारखी त्यांनाही विरघळण्याचिच ओढ होती?

शेवटी अस्तित्वासाठी सुरू असलेली धडपड च बरेचदा ते नाहीसेही करते. त्याउलट विरघळणारा प्रत्येक घटक मात्र अस्तित्व संपूनही मागे ठेवतो एक ओळख.... चंदनाच्या सुवसासारखी.... अठवणीत आणि साठवणीत सुद्धा.

भिरभीरणार्‍या ह्या शब्दांना अखेर मिळाली एक जागा. रेशेवर स्थिरावले अलगद तेंव्हा तयार झाली एक सुंदर कविता, जेंव्हा मी कवितेत गुन्तायची संपले, तेंव्हा माझ्यासाठी ती पूर्ण झाली होती, कारण कवितेचे आणि माझे खरे नाते ती पूर्ण होईपर्यंतच, त्यानंतर मी ती स्वाधीन करते,

अश्याच असंख्य भावनांच्या हिंदोळ्यांना विसावण्यासाठी.....

2 comments:

  1. Kaay sunder lihile aahes... waah. Tich ti bhawana nawinyane sapadali.... tech te ekatepan nawyane sapadale.... Aani ekatepan bhetalyacha pan aanand zala...!! Swatahache aastitwa wisaralyashiway wiraghalun jaata yet nai he matre khare.... (Interestingly I could predict that this thought is coming). Shabdana reshewar thewalyawar purnatwa laabhate.... Couldn't agree more. Hya wicharat kaay aathawale tar Sandip Khare che pustak - Maunanchi bhashantare. Tyat, shaletali wahi asate tashi paane aani tyat lihilelya kavita. 2-3 trikoni dumadaleli paane pan aahet. Ashyaprakare Khasam khaas lihile aahes. Tuzi shabdanchi niwad khupach chhan aahe.

    ReplyDelete
  2. Thanks Ashutosh. Tujhya comments awadlya. Maunachi Bhashantare chi athvan mala suddha jhali. Aaj ghari jaun nakki wachen to sangrah :)

    ReplyDelete