मुठितुन निसटणारा निर्भेळ आनंद

गेल्या वर्षी वेळ मिळेल तसे आणि सुचेल तसे ब्लॉग पोस्ट्स लिहिले, पण मनापासून समाधान वाटेल अशी एखादी पोस्ट उतरलीच नाही. त्यामागचे महत्वाचे कारण लिहिण्यातला हरवलेला सूर... खरतरं नुसत्या लिहिण्यातलाच नाही तर विचार करण्यातला सुद्धा... हल्ली विचार करणेच कमी झाले आहे. एकसंध, सुरळीत, तथाकथीत झाले आहे सगळे.

असे असले तरीही आठवड्या दोन आठवड्यातून कधीतरी निवांत मोकळा वेळ मिळतो. बरेचदा हा वेळ काहीतरी निरर्थक TV वर बघण्यात किंवा ब्राउज़िंग करण्यात निघून जातो. आणि शेवटी जेंव्हा TV किंवा लॅपटॉप कडे बघून डोळे थकून जातात तेंव्हा आम्ही झोपतो. पण मनात मात्र सारखे वाटते काहीतरी मोठे, mesmerize करणारे घडावे, दिसावे, वाचावे...

अर्थातच काही घडत नाही की, घडावे असा प्रयत्नही माझ्याकडून होत नाही.

एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवत रहाते आणि प्रचंड खटकते ती म्हणजे माझे अत्यंत कमी झालेले attention span. कुठलीही गोष्ट समोर आली तरी त्यामधे मी ५ - १० मीनिटान्पेक्शा जास्त काळ रमु शकत नाही. एखादे गाणे १० सेकंद ऐकून ते चांगले की वाईट हा शिक्का लावून टाकते, एखाद्या लेखातील keywords वर - वर वाचून तो कसा असेल ह्याचा अंदाज मनात बांधून घेते, सिनिमा चे ट्रेलर १ मीनिट बघून, तो बघायचा की नाही हे मानात ठरवून टाकते...

कदाचित सर्व गोष्टी सहज उपलब्ध असल्याने हे असे झाले असेल. अमुक एक गोष्ट आपण मिळवू शकतो, शिकू शकतो, किंवा गरज पडल्यास माहीत करून घेऊ शकतो हा माझा confidence (?) बर्‍याच प्रमाणात सध्या readily available असलेल्या latest and greatest technology वर आधारलेला आहे.

एखाद्या सिनेमा चे नुसते ट्रेलर बघून आणि त्याचा विकी वाचून मी सहज त्याविषयी माहिती मिळवु शकते. पण मग actual सिनेमा बघायला जाण्यात काही point आहे की नाही? social media वर virus सारख्या पसरणार्‍या ह्या अपडेट्स पर्सनली माझ्यातील अप्रूप वाटण्याचे दोन चार क्षण अक्षर्ष: हिरावून घेत आहेत.

एखादे गाणे, सिनेमा, पुस्तक स्वत: वाचण्याच्या आधीच त्यावरील लोकांचे मत सगळीकडे मोठ्या अक्षरात वॉल पोस्ट च्या रूपाने झळकते, सहाजिकच आपणही लोकांच्या चश्‍म्यातून ते काही काळ बघण्याचा एक केविलवाणा प्रयत्न करतो. पण बहुतेक वेळा त्यांना जे दिसते ते मला का दिसत नाही अशी घालमेल मनात चालत राहते.. आणि निराश होऊन अपण एक बाजू नीवडुन आपले मत बनवून टाकतो. अश्याने एखाद्या नितांत सुंदर कलकृतीमधे समरसून जाण्याचा आणि नविण्याचि सुंदर अनुभूती मिळण्याचा निखळ आनंद हरवून बसतो.

कधी कधी मित्र मैत्रिणिंच्या फोटो आलबम्स मधे बघून बघून एखादे पर्यटन स्थळ इतके परिचयाचे होऊन जाते, की तिथे स्वत: भेट दिल्यावर होणारा भव्यतेचा, सुंदरतेचा आनंद दहापटिने कमी जाणवतो. काही वेळा एखादी जागा overrated वाटायला लागते, आणि तिथे जाण्याचा उत्साह विरून जातो.

लहानपणी एका जागी बसून ३ - ४ तास पुस्तक वाचायचे, सन्ध्याकाळि तासभर देवासामोर शुभंकरोती म्हणायचे, शाळेत मूल्य-शिक्षणाच्या तासाला अर्धा तास ध्यान लावून बसायचे. इतके एकाग्रपणाचे संस्कार माझ्यावर होऊनही गेल्या फक्त ५ वर्षात internet आणि त्या ओघाने येणार्‍या अनेक गोष्टींमुळे माझी एकाग्रता कमालीची कमी होत आहे.

पुन्हा एकदा लहानपणिचे शिकलेले सगळे एकवटुन स्वत:वर एकाग्रातेचे संस्कार करायची वेळ आली आहे. पहिली पायरी म्हणून स्वतः ला social media पासून शक्य तितके दूर ठेवणार आणि एखादे छानसे पुस्तक हाती धरणार आहे.

2 comments:

  1. Agdi mazya manatl lihilays...
    Aapn jag itaranchya chashmyatoon jasti bghtoy halli... Itaranna kaay watel tyavarun aapal mat tharavtoy...
    We judge the moment more and live the moment less..!!

    ReplyDelete
  2. ho sadhya exponentially wadhat chaalalelyaa social networking mule kuthetari aswastth whayla hote. tyach wicharatun ha blog lihila ahe.

    Thanks for acknowledging! and welcome to my blog :)

    ReplyDelete