Catching up....

गेल्या वर्षभरात इथे लिहिणे जवळ - जवळ बंदच झाले आहे. भरपूर नवीन गोष्टी घडल्या गेल्या वर्षात. जुनी नोकरी सुटली, २ महिने घरी राहण्याचा आनंद घेतला. मग अगदी अनपेक्षित रित्या चांगली नवी नोकरी मिळाली. कामाच्या स्वरूपात फारसा बदल नसला तरी हि नोकरी न्यूयॉर्क मध्ये आहे. ह्या निमित्ताने एका खूप दुरून बघितलेल्या जगाचा खूप जवळून संपर्क येत आहे. न्यू यॉर्कर  होणे मला आवडते कि नाही ह्याचा मी फारसा कधी विचार नाही केला, पण दुनियादारी च्या दृष्टीने एक समृद्ध करून जाणारा हा अनुभव नक्कीच आहे.

मला स्वतःला न्यू यॉर्क  बद्दल आवडलेली गोष्ट -- इथे गर्दी मधला प्रत्येक जण स्वतःची अशी खास ओळख बाळगून असतो. जगाच्या काना-कोपऱ्यातून आलेले लोक इथे एक वेगळीच एनर्जी  घेऊन येतात. मस्त वाटते ह्या गर्दीत एकरूप व्हायला, आणि कधी कधी एखादा निवांत कोपरा पकडून गर्दीकडे नुसते बघत बसायला.

माझ्यातल्या सेल्फ अवेअरनेस ला जागृत करण्याचे मोठे काम हे शहर सध्या करत आहे. हा अवेरनेस आणि हि ओळख मला फक्त उंची कपडे, मेकअप  ह्यापुरती मर्यादित ठेवायची नहिये तर ह्यातून विचारांची प्रगल्भता आणि संवेदनशीलता अंगी बाणायाची आहे. माझ्यातल्या स्मॉल टाऊन मुलीला नेहमीकरता पुरेल असे शिक्षण हे शहर मला दररोज देत आहे.

रोजच्या तीन तासाच्या प्रवासात मी पुष्कळ वाचन करते. ह्या वाचनातून माझ्या पुढच्या वाटचालीला एक योग्य दिशा मिळत आहे. पण वाचन ही एक स्टिम्युलेटिङ्ग प्रोसेस आहे, त्यामुळे वाचनातून बरेचदा विचारांचे नवीन थ्रेड्स सुरु होतात आणि ते वेळीच शब्द-बद्ध करणे आवश्यक आहे, त्यामुळे आता पुन्हा नव्याने लिहिणे सुरु करणार आहे.

ह्या नव्या वाटचालीत तुम्हा सर्व वाचकांच्या शुभेच्छांची गरज आहे. तेंव्हा ब्लॉग ला नक्की भेट द्या आणि प्रतिक्रिया नक्की कळवा :)

पिंपळपान

एक आहे पाउस माझ्या मनात साठवलेला
तुझ्यासाठी बरसलेला तुझ्याविन आसुसलेला

एक आहे पिंपळपान माझ्या वहित ठेवलेले
ज़ाळिदार नक्षीसारखे मनावर कोरलेले

एक आहे रात्र तुझ्यासाठी जागलेली
चांदण्यांचे कवडसे मनात शिंपत गेलेली

एक आहे इंद्रधनू श्रावणात प्रकटलेला
सप्तरंग सप्तसूर तृप्त पिऊन घेतलेला

एक आहे तुझा शब्द ओठांवर आलेला
लिहिता लिहिता माझी कविता बनून उमटलेला

कलाकार

मला आठवते ती 'त्या'ची आणि माझी पहिली भेट शाळेत असतानाची. सातवी च्या सुटट्यात मुंबईला आत्त्याकडे पहिल्यांदा ऐकलेले 'त्या'चे गाणे "तू..." ने अक्षरशः वेड लागले होते. खरतरं तेंव्हा त्याच्या गायकीपेक्षा 'त्या'चा क्यूट चेहरा जंपिंग डॅन्स स्टेप्स हेच जास्त आवडले होते.



अजूनही आठवते, तो आल्बम बघून अनेक टीनेजर मुलांनी नाव्हयाकडे जाउन स्पेशली करून घेतलेला मशरूम कट. त्यानंतर बर्‍याच सलॉन वाल्यांनी 'तो' आमच्याकडेच केस कपतो असे सांगून भरपूर मार्केटिंग केले. शाळेतल्या आम्हा मुलींचा तर 'तो' प्रचंड लाडका..., पहिल्यांदा टीनेज स्टार म्हणून कोणाचे पोस्टर रूम मधे चिकटवले असेल तर ते 'त्या'चे.

पण एक गायक म्हणून 'तो' खरा खुरा मनाला भावला जेंव्हा पहिल्यांदा वॉकमॅन मधे त्याचे "दीवना" ऐकले तेंव्हा. "दीवना... " मधली सगळी गाणी इतकी आवडली की ज्यांच्यावर picturize झाले ते मक्ख चेहेरयाचे मॉडेल्स सुद्धा एकदम स्टार वगैरे वाटायला लागले. :) "दीवना..." मधली सगळीच गाणी सुरेख, पण माझे सर्वात आवडते गाणे "कुछ तुम सोचो, कुछ हं सोचे फिर खुशी का मौसम आए....". प्रेमाची व्याख्या अजुन कोणती असुच शकत नाही इतका खोलवर परिणाम 'त्या' च्या गाण्याने माझ्यावर केला.

त्यानंतर 'तो' अनेक वर्ष regularly घरी येत राहिला "सा रे ग म " चा निवेदक म्हणून. त्याचा आवाज गाताना जितका मधाळ तितकाच निवेदन करताना मृदू, संयमीत...

प्रत्येक स्पर्धाकचे प्रोत्साहन, कौतुक, परीक्षकांविषयीचा आदर, आणि संगीतवर मनापासून असलेले प्रेम; त्याच्या प्रत्येक निवेदनातून प्रेक्षकाच्या थेट मनापर्यंत पोचले. त्याचे टिपिकल आवाजात "नामष्कर आपका स्वागत संगीत के उस सुरीले सफर में जिसका नाम है, TVS 'सा रे ग म' " आताही लिहिताना कानात वाजल्यासारखा वाटला. "सा रे ग म" चा दर्जा 'त्या' च्या काळात उत्कृष्ट होता हे वेगळे सांगायलाच नको.

शब्दांवर अक्षरश: प्रेम करून ते सुरंमधे गुंफायचे, इतके की भावना त्या शब्दान्पेक्शा वेगळी अशी काही नसावीच, हे सर्वात प्रथम 'त्या' ने शिकवले. 'त्या'च्या उत्कट शब्दांनी जेमतेम performance असलेली अनेक गाणी आस्विमारणीय झाली.
"अच्छा सिला... " सारखा ब्रेकप सॉँग ने सगळ्यांच्या परिचयाचा झालेल्या त्यानेच प्रेम करायला शिकवले "मुझे रात दिन बस मुझे चहती हो", romance शिकवला "इन लम्हो के दामन में..", सौंदर्या चे स्वरबद्ध रूप साकारले "साथीया..." मधून,
डॅन्स शिकवला "आखियो से गोली मारे... " मधून. आणि जीवनाचे सार शिकविले ते "कल हो ना हो .. " मधून. 'त्या'ने "कल हो ना हो... " इतके अप्रतिम गायले की मला SRK ला सुद्धा आवडायला भाग पडले :). "तानाहाई.." आणि "जाने नाही देन्गे तुझे... " ने एक वेगळीच घालमेल त्याने शब्दात बांधली.

प्रेक्षकांच्याच ह्याच प्रेमापोटी असेल कदाचित, 'तो' अजुन एक गॅंबल खेळायला निघाला, actor बनण्याचे. तिथे नशीबाने म्हणावी तशी साथ दिली नाही, कदाचित तो त्याचा पिन्ड नाही.. पण त्या अपयशामुळे त्याच्यातला उत्कृष्ट गायक कधीच superseed
झाला नाही. उलट त्याच्या प्रत्येक गाण्याने तो बनत गेला अजुनाच परिपक्व.

3 idiots ची success चे योग्या credit जेंव्हा 'त्या' च्या कलेला मिळाले नाही तेंव्हा, 'त्या' च्यातल्या मनस्वी कलाकारने विधु चोप्रा साठी गायला नकार दिला.



त्यानंतर गेल्या वर्षी 'तो' पुन्हा एकदा नव्याने भेटला "अभी मुझमे कही..." च्या रूपात. ते गाणे त्याने ज्या तन्मयतेने म्हटले ती तन्मयता एका जातीवांत कलाकरकडेच सापडेल. नुसत्या शब्दानी आणि सुरानी संपूर्णा गाणे पेलवुन धरण्याचा आणि mesmarize करण्यच्या अपूर्व कलेचा सुंदर अविष्कार त्या गाण्याच्या रूपात झाला.

"अभी मुझमे काहीं..." नेहमीसाठी माझ्या मनाच्या एका कप्प्यात तेवत राहील, शांत पणतीप्रमाणे...

गेल्या अठवड्यात, त्याला प्रत्यक्ष बघण्याची, ऐकण्याची संधी मिळाली कॉन्सर्ट होती "क्लोज़ टू माय हार्ट". त्याच्या आवडत्या प्रत्येक गायकीला आणि गायकला ट्रिब्यूट देणारा कार्यक्रम. साधारण साडे तीन तसाची ती सुंदर संध्याकाळ कधीही न वीसरू शकणार्‍या क्षणांचे चांदणे मनात शिम्पुन गेली. अजूनही त्या स्वरान्मधे मी कुठेतरी हरवली आहे, त्याने गायलेल्या गाण्यासारखी...

अश्यावेळी गुलज़ार मदतीला येतात. त्यान्च्या ओळी अठवतात..

वक़्त के सितम
कम हसीन नहीं
आज हैं यहाँ
कल कहीं नहीं

वक़्त से बड़े अगर
मिल गये कहीं

मेरी आवाज़ ही पहचान है
गर याद रहे

नाम गुम जाएगा
चेहरा यह बदल जाएगा
मेरी आवाज़ ही पहचान है