गेल्या वर्षभरात इथे लिहिणे जवळ - जवळ बंदच झाले आहे. भरपूर नवीन गोष्टी घडल्या गेल्या वर्षात. जुनी नोकरी सुटली, २ महिने घरी राहण्याचा आनंद घेतला. मग अगदी अनपेक्षित रित्या चांगली नवी नोकरी मिळाली. कामाच्या स्वरूपात फारसा बदल नसला तरी हि नोकरी न्यूयॉर्क मध्ये आहे. ह्या निमित्ताने एका खूप दुरून बघितलेल्या जगाचा खूप जवळून संपर्क येत आहे. न्यू यॉर्कर होणे मला आवडते कि नाही ह्याचा मी फारसा कधी विचार नाही केला, पण दुनियादारी च्या दृष्टीने एक समृद्ध करून जाणारा हा अनुभव नक्कीच आहे.
मला स्वतःला न्यू यॉर्क बद्दल आवडलेली गोष्ट -- इथे गर्दी मधला प्रत्येक जण स्वतःची अशी खास ओळख बाळगून असतो. जगाच्या काना-कोपऱ्यातून आलेले लोक इथे एक वेगळीच एनर्जी घेऊन येतात. मस्त वाटते ह्या गर्दीत एकरूप व्हायला, आणि कधी कधी एखादा निवांत कोपरा पकडून गर्दीकडे नुसते बघत बसायला.
माझ्यातल्या सेल्फ अवेअरनेस ला जागृत करण्याचे मोठे काम हे शहर सध्या करत आहे. हा अवेरनेस आणि हि ओळख मला फक्त उंची कपडे, मेकअप ह्यापुरती मर्यादित ठेवायची नहिये तर ह्यातून विचारांची प्रगल्भता आणि संवेदनशीलता अंगी बाणायाची आहे. माझ्यातल्या स्मॉल टाऊन मुलीला नेहमीकरता पुरेल असे शिक्षण हे शहर मला दररोज देत आहे.
रोजच्या तीन तासाच्या प्रवासात मी पुष्कळ वाचन करते. ह्या वाचनातून माझ्या पुढच्या वाटचालीला एक योग्य दिशा मिळत आहे. पण वाचन ही एक स्टिम्युलेटिङ्ग प्रोसेस आहे, त्यामुळे वाचनातून बरेचदा विचारांचे नवीन थ्रेड्स सुरु होतात आणि ते वेळीच शब्द-बद्ध करणे आवश्यक आहे, त्यामुळे आता पुन्हा नव्याने लिहिणे सुरु करणार आहे.
ह्या नव्या वाटचालीत तुम्हा सर्व वाचकांच्या शुभेच्छांची गरज आहे. तेंव्हा ब्लॉग ला नक्की भेट द्या आणि प्रतिक्रिया नक्की कळवा :)
No comments:
Post a Comment