पोहणे - एक अनपेक्षित मित्र

दिवसातले जवळपास १० तास computer समोर बसून घालवल्यावर, बसणे हि एक व्याधी वाटायला लागली होती. काहीतरी व्यायाम करायला हवा असे खूप वाटत होते, पण इथे सुरु होउ घातलेल्या  थंडी मुळे नक्की काय करावे ते सुचत नव्हते. तसा गेल्या वर्षी हिवाळ्यात जिम ला जायचा आटोकाट प्रयत्न केला. पण अगदी हाकेच्या अंतरावर असूनही जिम ला जायचा आणि त्या ट्रेडमिल वर एकसंध चालण्याचा उत्साह फार दिवस टिकवणे अवघड गेले. त्यामुळे नवीन वर्ष सुरु होताच ह्यावर्षी पोहण्याचा क्लास लावायचाच असा चंग आम्ही बांधला होता. त्याप्रमाणे सप्टेंबर महिन्यात क्लास मध्ये नाव घातले. खर तर ७ - ८ लोकांच्या क्लास मध्ये आपल्याला कितपत कळेल आणि कितपत जमेल हि एक शंकाच होती, पण प्रायव्हेट क्लास ची फीस परवडण्यासारखी नव्हती त्यामुळे ग्रुप क्लास घेऊन बघू असे ठरवले.

पाण्याची भीती वगैरे वाटत नव्हती पण लहानपणी दमा होता आणि नाकातोंडात पाणी गेले तर बराच वेळ खोकला येईल असे वाटत होते. पण पाण्यात उतरायच्या आधीच फार विचार नाही करायचा असे ठरवले. पहिल्या दिवशी क्लासमध्ये  अपेक्षेप्रमाणे  ७ -८ लोक होते. पूल कमी पडणार असे वाटत होते, पण आमची इन्स्ट्रक्टर खूप उत्साही होती तिने भरभर खूप सारी माहिती द्यायला सुरुवात केली, फक्त एकदाच तिने आम्हाला पाठीला टेकण  देऊन पाण्यात उलटे तरंगण्याचा अनुभव करून दिला, आणि खरतर तेंव्हाच एक खूप महत्वाची गोष्ट लक्षात आली, कि खरंतर पाणी तुम्हाला तरंगायला सपोर्ट करते. आणि जितके तुम्ही पाण्याशी मैत्री कराल तितके हातपाय मरणे आणि एनर्जी न घालवता सहजपणे पोहणे सोपे जाते. हळुहळु क्लास मधली संख्या कमी होत गेली पण आम्ही मात्र प्रयत्न सुरु ठेवले.

खरतर मला आणि अनिकेत ला असे कधीही वाटले नव्हते कि इतक्या वर्षांनी, शरीराला आणि स्नायूंना एक प्रकारचे वळण लागल्यावर पोहणे शिकणे शक्य होईल, पण धडपडत चाचपडत, गिअर सोबत पोहता पोहता पाण्याशी मैत्री कधी झाली ते कळलेच नाही.पाठीवर उलटे पाण्यावर तरंगणे  हा तर एक मेस्मारेझिंग अनुभव आहे. पाण्याखाली एकदा कान गेले, कि डोक्यातला सगळा कोलाहल शांत होतो. पाण्याचा नाजूक किणकिण रव  फार सुखद असतो. काही क्षण अगदी ध्यान लावून बसल्यासारखी शांतता अनुभवता येते.

आमची इंस्त्रक्टर म्हणते, मोठ्या लोकांसाठी पोहणे शिकणे म्हणजे दहा टक्के टेक्निक  अणि नव्वद टक्के सायोकोलोजी. आणि आम्ही आता खूप अभिमानाने सांगू शकतो कि पोहण्याची  मानसिक  तयारी आमची झाली आहे, आता मस्त सराव करून टेक्निक्स डोक्यात घोटून घोटून बसवत आहोत.

खूप रटाळ आणि आळशी दैनंदिनीमध्ये अनपेक्षित पणे आलेल्या ह्या नवीन मित्रामुळे आम्ही सध्या खूपच खूष अहोत. ह्या वेळचा हिवाळा सत्कारणी लागतोय आणि सोबतच उन्हाळ्यामधल्या  एखाद्या समुद्रकिनारच्या सहलीची आम्ही वाट बघतोय. प्रत्येकाने कधीही अगदी कधीही बनवावा असा हा प्रेमळ मित्र आहे. तुम्ही पोहायला शिकला नसाल तर नक्की शिका आणि शिकला असाल तर वारंवार वेळ काढून ह्या मित्राला भेटायला नक्की जा..

Wishing you happy swimming :D

No comments:

Post a Comment