... ... ...

काल 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल' नावाचा शो बघत होते. format प्रमाणे शो यथावकाश सुरु होता. सुरुवातीची कॉमेडी स्किट संपली आणि मग "सेलेब्रिटी" कलाकाराची एन्ट्री झाली. अपेक्षेप्रमाणे टाळ्यांच्या कडकडाटात आणि जल्लोषात प्रतिसाद  मिळाला. कलाकार आपली कला सादर करत होता आणि सगळे प्रेक्षक आनंदाने आस्वाद घेत होते.

दुसाऱ्या segment मध्ये  anchor ने काही चाहत्यांना कलाकाराला भेटायला स्टेजवर बोलवले. एक प्रेक्षक उठून स्टेज  वर आला अणि अक्षरश: कलाकाराच्या अणि anchor च्या पायावर डोके ठेवणे  सुरु केले. आपल्या आवडत्या कलाकाराला बघून चाहता उत्तेजित झाला होता हेय मान्य आहे, पण चार-चारदा पाया पड्ण्याईतका लाचार पणा ह्या व्यक्तीने का करावा हे काही मला समजले नाही.

खरच, काय धन्यता वाटते - सेलेब्रिटिज , नेते, खेळाडू ह्यांची हांजी-हांजी करण्यात? एक चाहता म्हणुन यांचे सगळे कार्य, सगळे रेकॉर्ड्स, सगळ्या बातम्या लक्षात ठेवणे, त्याची कात्रणे जमा करणे, प्रसंगी त्यांच्या बाजून एखाद्या मित्राशी वाद विवाद करणे - हि एक गोष्ट आहे. पण तरी आपला सेल्फ एस्टीम इतका कमी ठेवावा, कि निव्वळ कोणाच्या पाया पाडण्यात धन्यता मानावी? अस करताना जे लोक आपल्याला वडील, मित्र, शिक्षक किंवा आदर्श मानतात त्यांच्या समोर आपण कुठला आदर्श निर्माण करतोय इतका तरी विचार करावा.

चांगले काम आपण सगळेच जण करत असतो, किंबहुना आपण इमानाने करतो ती नोकरी किंवा व्यवसाय हे सुद्धा कोणाच्यातरी भल्यासाठी केलेलेच काम असते, असे असताना फक्त पडद्यावर दिसते म्हणून एखाद्या व्यक्तीपुढे स्वतःला क्षुल्लक का मानायचे?

Great ideas can come from anywhere! एकीकडे परस्पर सहकार्यातून एक सशक्त आणि जबाबदार समाज उभा करण्याचे स्वप्न बघताना दुसरीकडे मात्र आपण स्वतःची madiocrity अश्या पद्धतीने celebrate करायची? का - कशासाठी?

याउलट अशी संधी साधून तुम्ही करत असलेल्या एखाद्या चांगल्या कामाची ओळख लोकांना करून द्या, एखादा चांगला विचार लोकांपर्यंत पोचवा. तुमच्या आवडत्या कलाकाराला सुद्धा त्यामध्ये involve करा. कलाकाराचे active participation नसेल तरी त्याच्या उपस्थितीत लोकापर्यंत पोचवलेला विचार त्यांच्या नक्की लक्षात राहील. आणि जर तो कलाकार खरोखर संवेदनशील असेल तर तो देखील नक्कीच सहभाग घेइल. आणि यापैकी काहीही झाले नाही तरी तुम्ही स्वतः तुमच्या आजूबाजूच्या चार लोकांच्या आदरास नक्की पात्र ठराल.

बघा तुम्हाला पटतय का…

No comments:

Post a Comment