नोव्हेंबर सुरु झाला आणि आजूबाजूचे सुंदर रंगीबेरंगी दृश्य पालटून दोन तीन च रंग उरले. आता पुढचे पाच महिने असेच जाणार हि कल्पना च जीवावर यायला लागलि. काहीतरी वेगळे करायचे म्हणून मग या वर्षी क्रिस्टमस ट्री सजवायचा ठरवला.
क्रिस्टमस शॉप मधले सगळे सामान बघून मला एकदम गणपती आणायला बाजारात जायचो तेंव्हाची आठवण झाली. तसाच उत्साह, सगळीकडे केलेली आकर्षक सजावट आणि मागे लावलेली क्रिस्टमस कॅरोल्स. आधी तर मोठा ट्री घेऊ खूप चार्म्स लावू असे स्वप्न बघत होतो. पण मग जागा आणि पाकीट यांचा विचार करून छोटेसे हिमाच्छादित ट्री घेतले.
चार्म्स तर किती आणि कोणते घ्यावेत समजत च नव्हते. खूप वेगवेगळ्या प्रकारचे आणि प्रत्येकाच्या आवडीला साजेसे होते. आम्ही गेल्या वर्षात काय काय केले त्याच्याविषयीचे चार्म्स घेतले. त्यातले काही:
इथे मॉल मध्ये आमच्या आवडीचे पॉप कॉर्न मिळतात. कधी कधी आम्ही नुसते खायला तिकडे जातो :)
गाणी ऐकण्याची आवड यापलीकडे या चार्म चे विशेष काही नहिये. पण दिसायला भलताच सुंदर आहे!
किमान दोन डझनभर चपला बूट घेऊन अजून पण कमीच वाटतात!
हा एकदम आवडता सध्याचा, नवीन नवीन शिकतोय त्याचा
आणि हि आमची पूर्ण सजलेली रंगीबेरंगी ट्री.
Wish you all happy holidays :)
No comments:
Post a Comment