आज सकाळी घराबाहेर पडले, Elevator मधून बाहेर येताना एक क्षण वाटले सगळिकडे धुके पसरलेयं.… पण बाहेर आले अन् हलकेच स्पर्श झाला, तुषारांचा, दवासारखा पाऊस पसरला होता... इतका सुंदर पाऊस या पूर्वी मला कधीच भासला नव्हता. पाऊस जेंव्हा पहिलाय तेंव्हा रिम झिम, किंवा तुफान कोसळणारा. आजचा मात्र खूपच वेगळा होता. सुखावून जाणारा...
सध्या इथे, उन्हाळा संपाण्याच्या आणि हिवाळा सुरू होण्याच्या मधला काळ आहे. थोड्या दिवसातच झाडांचे, गवतांचे रंग बदलू लागतील, बदलणारे रंग अजुन अजुन गडद होत जातील... सगळिकडे मग नुसता रंगांचा उत्सव असेल… आणि त्यानंतर येणार्या हिवाळ्याचि चाहूल लागेल...
माझ्याही बाबतीत सध्या असेच काहीतरी सुरू आहे, गेले वर्ष - दीड वर्ष नोकरीत आणि KC मधे स्थिरावले आहे, नाही म्हणायला चांगले मित्र मैत्रिणी सुद्धा हळूहळू झाले आहेत, गाडी असल्यामुळे बाहेर भटकणेहि वाढले आहे, कामातला नावखेपणा, भांबावलेपणाहि जाऊन आता जरा गोष्टी Sync Up झाल्या आहेत… पण आता मलाही चाहूल लागतीये, लवकरच सुरू होणार्या नव्या Phase ची, पुन्हा एकदा नवीन जागा, नवीन नोकरी, काही नवीन लोक आणि काही जुनेच मित्र मैत्रिणी नव्याने भेटणार आहेत…
सध्या माझ्याही मनात सरलेला ऋतू आणि येऊ घातलेले क्षण यांची विलक्षण सरमिसळ झाली आहे, एखादे ठिकाण अनोळखी म्हणता म्हणता आपले कधी होऊन जाते कळतच नाही, जागेशी बांधलेले हे धागे चिवट असतात, नुसत्या नावानेच तिथल्या सगळ्या गोष्टींशी आपल्याला गुंतवून ठेवण्याइतके समर्थ असतात….
आजच्या या भीजलेल्या सकाळि त्या पावसाच्या साक्षीने, गाडी चालवताना, मनात उठलेले हे शब्द तरंग.. आणि ओठांवर रेंगाळणारि सौमित्रची कविता…
पाऊस पडून गेल्यावर मन पागोळयांगत झाले
क्षितीजाच्या वाटेवरती पाण्यावर रांगत गेले
थेंबाना सावरलेल्या त्या गवताच्या काडान्चा
पाऊस पडून गेल्यावर मी भीजलेल्या झाडांचा
पाऊस पडून गेल्यावर मन थेंबांचे गारांचे
आईस चकवूनि आल्या, त्या डबक्यातील पोरांचे
मोडून मनाची दारे इवली पाऊले पडती
पाऊस पडून गेल्यावर या ओल्या रस्त्यांवाराती
पाऊस पडून गेल्यावार मी चंद्र चिंब भिजलेला
विझावुन चांदण्या सार्या विझलेला ,शांत नीजलेला
पाऊस पडून गेल्यावर मन भिरभिरता पारवा
पाऊस पडून गेल्यावर मन गारठता गारवा......
Bharich.. awesome.. !! pawsache wegale swaroop.. nice one.. analogy suddha ek number aahe.. may you have many more such bhijari sakals.. ;-)
ReplyDeleteBravo !!! Very fantastic article. Keep it up.
ReplyDeletePappa
खूपच छान....!!! अशी एखादी भिजलेली सकाळी नक्कीच असावी... आठवणींमध्ये राहण्यासारखी... :)
ReplyDeletesahiiii....khupach chhan akka....
ReplyDelete