खोया खोया चाँद..

सध्या काहीतरी विचित्र सुरू आहे. नक्की काय माहीत नाही पण धरवत नाही आणि सोडवत सुद्धा नाही असे काहीतरी आहे. खूप शोधले चाचपडत राहीले अंधारात बराच वेळ काहीतरी हाती लागेल ह्या आशेने पण काहीच हाती लागले नाही.

रात्र बरीच उलटून गेली आहे. हातातला पेन रात्रीच्या गडद शाइत बुडवून मी काहीतरी खरडत चाललीये कागदावर.





त्या उंचच उंच वाढलेल्या पाइन आणि वीलो च्या झाडातून एक प्रकाश पाझरातो आहे. बर्फाच्या तुकड्यंवर पडताच पारावर्तीत होणारा नागमोडी वळण घेत एका चिन्चोळ्या पाउलवाटेने मिट्ट खाळोखात विरघळणरा.ओढ्याच्या कडेकडेने ती शाहारलेली रात्र निघाली आहे अंगावर धुके पांघरून, उब जपत...

माझ्या मनातल्या विचारांना मात्र समुद्रासारखीच भारती आली आहे. चंद्राचे आकर्षण त्यांनाही असते की काय....? पण चंद्र तर कुठे दिसतच नाहीए, झाडांच्या नक्षितून सांडणार्‍या त्या प्रकाशात मी नजर रुतवुन चंद्र शोधते आहे.
कदाचित मगापासून मी त्यालाच शोधते आहे, तो चंद्रच मला अस्वस्थ करून जातोय...


लहानपणी चे चांदोबा चांदोबा भागालास का, आठवतय. पण त्यावेळि सुद्धा ते गाणे मला भकास च करून जायचे, आणि आता ही..

क्यूँ खोए खोए चाँद की फिराक में तलाश में उदास है दिल
क्यूँ अपने आप से खफा खफा ज़रा ज़रा सा नाराज़ है दिल
ये मंज़िलें भी खुद ही तय करें
ये फ़ासले भी खुद ही तय करें
क्यूँ दो रास्तों पे फिर सेहेम सेहेम संभल संभल के चलता है ये दिल
क्यूँ खोए खोए चाँद की फिराक में तलाश में उदास है दिल.......

1 comment:

  1. Kay mhanawe.. shabda aani wichar hyanchi sangad apratim aahe.. mhanaje shabda tula nehamich sapadtat.. pan dar weles wiwdhaparine tyanchi wicharansobat asleli sangad wakhananyajogi aahe.. tyawar chandra aani ratra hyanchi wicharansobat asleli gofan kharach chan aahe.. specially chandra wichar aani samudra bharati wala thought..!! Khoya khoya chand song.. best aahe.. artha lawawa tewadha kamich aahe.. gahira intellectual, emotional aani hurhur lawnara.. mast aahe blog.. super liked :)

    ReplyDelete