आज खूप दिवसांनी काहीतरी मार्मिक लिहावेसे वाटले. त्याला कारणही तसेच आहे. सध्या माझे नवीन नोकरी शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अगदी पहिला-वाहिला जॉब, नव्याची नव्हाळि, कामातला भांबावलेपणा जाउन एक दिवस अचानक खूप कॉन्फिडेंट वाटायला लागते ते रियलाइज़ेशन, पहिला पे-चेक, मॅनेजर ने केलेले पहिले कौतुक, टीम-मेट सोबत झालेले पहिले खेळकर किंवा वादळी डिस्कशन, हे सगळे काही सोडून जाताना वाईट वाटेलच. पण काही वेळा पर्सनल prefrences profession ला टेक ओव्हर करतात आणि मग रोजच्या एकसंध चाललेल्या आयुष्यात काही बदल घडववे लागतात. कधी ते ना ठरवता आणि नकळत घडतात. कारणे काहीही असोत, "Change is the only constant thing" हे वाक्य कधी-कधी शब्दश: पटते.
असो, तर एकंदरीतच नोकरी सोडण्याचा पहिला-वहीला अनुभव ह्या निमित्ताने लवकरच येईल. मग बॉसशी कसे कोणत्या शब्दात बोलावे हा विचार नकळतच रोज डोक्यात घोळत राहतो. मीच माझी वाक्य पुन्हा पुन्हा मनात आठवत राहते, बॉसचे एक्सप्रेशन्स काय असेल ह्याचे उगीच अंदाज बांधत राहते. आणि मग अचानक लक्षात की प्रॅक्टिकल, प्रोफेशन, करियर असे जड जड पुस्तकतले शब्द वापरूनही आपण कामाच्या ठिकाणी मानाने गुंतलेले असतोच. त्यात मी जुन्या गोष्टीत जरा काकणभर जास्तच वेळ रेंगाळते. "Life goes on" किंवा मग " You have to move on" किंवा "You need a closure" ह्या वाक्प्रचारांचा अर्थ मला तरी फारसा कधी लागत नाही. काही का असेना, कशीबशी त्या सो कॉल्ड Moving on with life, साठी मी स्वतःला तयार करते.
आपण नेहमी आपल्या पहिल्या इंप्रेशनला खूप महत्व देतो. "फर्स्ट इंप्रेशन इज लास्ट इंप्रेशन" असाही म्हणतो. इंटरव्यू साठी जाताना प्रेस केलेला फॉर्मल ड्रेस, आदबीने बोलणे, शेकहॅण्ड वगैरे सोपस्कार, ह्या सगळ्यातून गेलेल्या आपला कामाबद्दल तक्रारीचा कधी येतो हे कळतहि नाही...
पण एंट्री जितकी impressive तितकीच Exit graceful असावी ह्यावर कधी तितकासा भर दिला जात नाही, हे थोडे स्ट्रेंज वाटते. एका नवीन सुरुवातीसाठी आपण जितके आसुसालेले असतो तितक्या शांत, सुखद शेवटासाठी सुद्धा असायला हवे. कदाचित शेवट आणि सुखद ह्या दोन्ही कल्पनाच परस्परविरोधी वाटत असाव्यात. त्यातूनच तयार झालेला हा विलक्षण mindset असेलही कदाचित...
रोज वर्तमानपत्राचे कॉलम्स भरभरून जेंव्हा नेत्यांनी, पुढार्यानि नाइलाजाने, किंवा एखाद्या corruption च्या केस मधे अडकून, किंवा मॉरल ऑब्लिगेशन म्हणून रिज़ाइन केल्याचे वाचतो तेंव्हा वाटते, ह्या लोकांनी आपली exite graceful करण्याचा विचार रोज एकदा जरी केला असता तर त्यांच्यावर कदाचित अवकाळी exit होण्याची वेळच आली नसती. असो, कोणाला सल्ला देणे, किंवा टीका करणे ह्या हेतूने हे लिहीत नाहीए. पण एकूणच हा सगळा विचार करता करता लहानपणी ऐकलेली रॉबर्ट फ्रॉस्ट ची क्लॅसिक कविता आठवली.
Whose woods these are I think I know.
His house is in the village, though;
He will not see me stopping here
To watch his woods fill up with snow.
My little horse must think it queer
To stop without a farmhouse near
Between the woods and frozen lake
The darkest evening of the year.
He gives his harness bells a shake
To ask if there's some mistake.
The only other sound's the sweep
Of easy wind and downy flake.
The woods are lovely, dark and deep,
But I have promises to keep,
And miles to go before I sleep,
And miles to go before I sleep.
Bravo...I agree with you in all respects and nicely written.
ReplyDeleteI think the Exit depends on the person exiting and the people from whom the exit is...!! The interpersonal relationships have the most influence on the EXIT. I remember my Exit, and I was all emotional during that.
The work we get at the workplace also is the factor. Did I love it... Was it ok? Or is it the reason of my exit... And Where am I leading? Is it something better... Or just another change...
And with all these things, and the emotional quotient we have, we take a exit...The grace comes with a positive emotion for ppl at work, kind of work and the future (the station ahead).
Your point on preparation of an EXIT is so true and so highly under rated. Good you bring tht up...
About the sentences Move on, Need a closure... were not meant for understanding. They are the names given to what actually happens... We experience it and then realise the meaning...
So in the nutshell, Liked it very much.
Came across your blog. Nice posts. Enjoyed reading them Keep writing !!
ReplyDeleteThanks Ashutosh and Keya!
ReplyDelete