नवा उपक्रम - Restaurant Reviews

गेल्याच आठवड्यात long term साठी  पुण्यात राहायला आले. इतकी वर्ष बाहेर राहिल्याने इकडच्या आठवणींची पाटी  अगदी कोरी झाली आहे. तसंही ज्या जुन्या आठवणी आहेत त्या सगळ्या औरंगाबादच्या आणि कॉलेज मधल्या, त्यामुळे पुण्याबद्दल माझ नक्की अस काही मत सध्या तरी नाहीये. पण प्रत्येक नव्या गोष्टीकडे कुतीहालाने बघायचे असे मात्र ठरवून टाकले आहे


आज गुढी पाडव्याच्या निमित्ताने बाहेर जेवायला जाण्याचा बेत केला. इथले खाण्याचे शौकीन आणि आणि इथली अनेक खाद्य श्रद्धास्थान मला ऐकून माहित असल्यामुळे एखादा मस्त अनुभव घेण्याची उत्सुकता नक्कीच होती. अर्थातच आत्तापर्यंतच्या सवयीप्रमाणे restuarent येल्प/फोर स्क्वेअर/ झोमाटो वगैरे वर शोधण्याचा एक प्रयत्न करून पहिला आणि तेंव्हा प्रकर्षाने जाणवले कि इतके  खाण्याचे शौकीन असूनदेखील restaurant चे online reviews अगदी नावालाच आहेत. तेंव्हाच ठरवले कि ब्लोग वर restuarent चे reviewes टाकायचे आणि वेब वर सुद्धा.


तसा हा नवीन उपक्रम करायचा विचार बऱ्याच   दिवसांपासून होता. एकंदरीत च online platforms भरपूर उपलब्ध असूनही त्यांचा योग्य वापर करणारे आणि content contribution करणारे लोक खूपच कमी अहेत. आणि त्यामुळे नुकसान देखील आपलेच होतेय. चांगले दर्जेदार businesses व्यवस्थितपणे publicize होत नाहीत आणि आपल्याला देखील ऐनवेळी एखादी सेवा दर्जेदाररित्या  कुठे उपलब्ध होईल हे समजत नाही.


असो तर आता या नवीन उपक्रमाला माझ्या नव्या नवलाईचा हुरूप चढला आहे. आणि म्हणूनच आजपासून मी भेट दिलेल्या सर्व restaurant चा honest review लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे.

No comments:

Post a Comment