माझा देव

माझा देव कोणी मुर्तीत पहिला
माझा देव कोणी मंदिरात पहिला
माझा देव कोणी माणसात पहिला
पण माझा देव आहे का हो माझ्यात राहिला?

माझा देव कोणी प्रार्थानेत गायला
माझा देव कोणी श्लोकात म्हटला
माझा देव कोणी पोथित वाचला
पण माझा देव आहे का हो माझ्यात राहिला?

माझा देव साखर दाण्यात पोचला
माझा देव तीर्थ रूपाने पोचला
माझा देव अंगार्‍यातही पोचला
पण माझा देव आहे का हो माझ्यात राहिला?

खरतर माझा देव माझ्यातच असतो
भांबवलेल्या मानवर मायेची पाखर
दुखावलेल्या मानवर प्रेमाची फुंकर
आणि अशाळलेल्या मनावर आशिर्वदाची छाया तोच धरतो

मी मात्र माझ्या देवाला मंदिरात, श्लोकात, अन् तिर्थात शोधतो
माझा देव माझा आहे अन् तो माझ्यातच भरून राहिला...

-- गौरी

आज वाटते

आज वाटते कुठेतरी भटकावे
मउ गवतावर निवांत पडून राहावे
निळ्याशार अभाळाला घ्यावे अंगावरती
करव्यात नेहमीच्याच तरीही नव्या काही गोष्टी

आज वाटते कुठेतरी भटकावे
समुद्राच्या काठी वाळुवरति
तुझ्या अन् माझ्या पावलांचे ठसे ऊमटावे
ओन्झळित घ्यावे दोन मोती
एक माझा आणि एक तुझ्यासाठी

आज वाटते कुठेतरी भटकावे
गर्द हिरव्या रानात आणि नदीच्या काठी
पान पान झाड झाड सामील होतील हसण्यामाधे
भरून राहील तुझा नि माझा
निशब्द स्वर आसमन्ति

आज वाटते कुठेतरी भटकावे
डोंगर दर्‍यात टेकडी वरती
लहानपणी सारखे खेळुया धावत
सांगा तुमची दगड कि माती

आज वाटते कुठेतरी भटकावे
फक्त तुझ्यासाठी अन् माझ्यासाठी
नको ती धावपळ नको ती गजबज
हीच तर आहे दोन क्षणांची विश्रांती

-- गौरी

मोटिव्हेशन ऑफ द डे...

आजकाल मला रोज सकाळी ऑफीसला जायचा प्रचंड कंटाळा येतो. तशी म्हणायला मी अजुन कामात नवखी असले (स्वत:च्या चुका नजरेआड करायच्या वेळी ही आर्ग्युमेंट बरी पडते) तरी सुरुवातीपासूनच मला रुटीन चा कंटाळा फार लवकर येतो. खरतर चूक माझी नाहीए, रूटिन हा शब्दच इतका रूटिन आहे की कोणालाही त्याचे ओझे वाटावे. त्यात मी तर नुकतीच बॅचलर पॅड का काय म्हणतात ते अवघे अडीच वर्ष एन्जॉय केलेले.... सकाळी अन्थरुणातुन उठताना ब्रम्हाण्ड न अठवेल तर नवलच!

आता I hate Mondays इथपर्यंत गोष्ट असेल तर चालते पण इथे तर रोजचेच रडगाणे असते... शेवटी बराच विचार करून एक युक्ती काढली 'मोटिव्हेशन ऑफ द डे'... रोज रात्री झोपताना उद्या कोणते काम रोजच्या पेक्षा वेगळे करायचे आहे ते ठरवायचे. उदाहरणार्थ उद्या नव्या पिक्चर ची गाणी ऐकायची आहेत हेडफोन लावून कोडिंग करताना, किंवा डेस्कटॉप चा वॉलपेपर बदलायचा आहे, किंवा लंच बॉक्स मधे नावडती भाजी असेल तर कॅफेटेरीया मधून फ्रेंच फ्राइज खायचेत असे काही...

तुहाला वाटेल हे कसले आले मोटिव्हेशन... पण खरच सांगते इट वर्क्स! आता प्रत्येकाला एक्साईट करणारी गोष्ट थोड्याफार फरकाने वेगळी असु शकते. कोणाला नवीन मूव्ही चे रिव्यूज़ वाचायचे असतात, कोणाला नेहमीची कॅफे लाटे सोडून मोका घ्यावी वाटू शकते, तर कोणाला क्रिकेट ची ट्रायांग्यूलर सिरीज चालू आहे त्याचा स्कोर ऐकायचा उत्साह असु शकतो...

पण एखादे असे मस्त काम ज्यावर ऑफीस ला गेल्यावर मिनिट दोन मिनिट घालवावे. आणि मनाला ताजेतवाने करावे. मग उत्साहाने कामाला सुरूवात करावी, काहीवेळा ह्या सकाळच्या मोटीव्हेशन ची जादू म्हणून की काय पण आदल्या दिवशी डोके फोडले तरी प्रोग्रॅम मधे लक्षात न येणारा बग दुसर्‍या दिवशी तासाभरात सॉल्व्ह होतो. एकदा काम व्हायला लागले की दिवस कसा जातो ते कळत सुद्धा नाही... माझ्यासाठी कुठलेही इन्स्पिरेशनल कोट्स वाचण्यापेक्क्षा हे छोटेसे काम सो कॉल्ड रूटिन मधे नविण्य आणते, तुमच्यासाठी वर्क आउट होते का पहा...

अठवण

अठवण

माझ्या आठवणीत एक गाव आहे
आजीचं गाव असे त्याचे नाव आहे
आजीच्या घरासमोर रोजच सडा रांगोळी
दिवळीच्या दिवसात पणत्यांच्या ओळी

माझ्या अठवणीत एक शाळा आहे
बालपणीचा वास तिथे कायम निराळा आहे
शाळेच्या फ़ळ्यावर शारदेचे चित्र आहे
प्रार्थनेच्या वेळी जागा धरणारा माझा खास वर्गमित्र आहे

माझ्या अठवणीत एक स्वयंपाकघर आहे
भाजी आमटी इतकाच तिथे आ ई चा वावर आहे
सणासुदीला श्रिखंड पुरीचा बेत आहे
एरवि आ ईच्या हातचि पिठले भाकरी सुद्धा गोड आहे

माझ्या अठवणीत एक देवघर आहे
हळद कुंकुवाचा सडा अन् उद्बत्तिचा दरवळ आहे
सोवळं नेसुन पूजा करणारे बाबा माझ्या डोळ्यात आहेत
श्लोक आणि प्रारथनेचे स्वर अजुनहि कानात आहेत

माझ्या अठवणीत एक कॉलेज आहे
आमचे कॉलेज म्हणुन आम्हाला त्याची क्रेझ आहे
कधी हास्याचे तुशार तर कधी कट्यावरचे भांडण आहे
पण् रोजचं नाक्यावरचा चहा आणि कॅन्टिनचा वडापाव कायम आहे

माझ्या अठवणीत असे खुप सारे आहे
माणसांपेक्शा ज्याचे अस्तित्वच निराळे आहे
अठवणीचे अत्तर मनाच्या कुपित बंद आहे
आज हलकेच उघडले तर दरवळला सुगंध आहे

पहिले पान....

या ब्लॉग प्रकरणाला तशी मी नवीन नाहीये. इंग्लीश मधे पूर्वी दोन तीन वेळा ब्लॉग्स पोस्ट करून झालेत. पण माझ्या स्पोकन आणि रिटन इंग्लीश चा मला कितीही अभिमान असला तरी स्वत: ची अभिव्यक्ती मायभाषेत मधे जितकी सहजतेने समोर येते तितकी इतर कुठल्या भाषेत येणे तसे अवघडच. आता हेच घ्या अभिव्यक्ती ला इंग्लीश मधे काय म्हणतात ते सुद्धा आठवत नाहीये मला... मोठ्या हौसेने इंग्लीश ब्लॉग उघडला होता पण अवघ्या चार पोस्ट्स माधेच मला ब्लॉगचा आणि ब्लॉग ला माझा कंटाळा आला... इंग्लीश मधे लिहायचे म्हणून मलाही विषय सुचेनसे झाले आणि मी बळेबळेच ब्लॉग करत आहे म्हणून त्या ब्लॉगनेही मला साथ देणे कमी केले... म्हणून हा मराठी ब्लॉग चा घाट घालत आहे. खर तर इथे काय लिहिणार आहे किती लिहिणार आहे हे मलाही पुरते माहीत नाहीये अजुन.... पण नेहमीचेच रोजचेच बरे लिखाण होईल अशी अपेक्षा करते. लेट्स सी....