आज वाटते

आज वाटते कुठेतरी भटकावे
मउ गवतावर निवांत पडून राहावे
निळ्याशार अभाळाला घ्यावे अंगावरती
करव्यात नेहमीच्याच तरीही नव्या काही गोष्टी

आज वाटते कुठेतरी भटकावे
समुद्राच्या काठी वाळुवरति
तुझ्या अन् माझ्या पावलांचे ठसे ऊमटावे
ओन्झळित घ्यावे दोन मोती
एक माझा आणि एक तुझ्यासाठी

आज वाटते कुठेतरी भटकावे
गर्द हिरव्या रानात आणि नदीच्या काठी
पान पान झाड झाड सामील होतील हसण्यामाधे
भरून राहील तुझा नि माझा
निशब्द स्वर आसमन्ति

आज वाटते कुठेतरी भटकावे
डोंगर दर्‍यात टेकडी वरती
लहानपणी सारखे खेळुया धावत
सांगा तुमची दगड कि माती

आज वाटते कुठेतरी भटकावे
फक्त तुझ्यासाठी अन् माझ्यासाठी
नको ती धावपळ नको ती गजबज
हीच तर आहे दोन क्षणांची विश्रांती

-- गौरी

No comments:

Post a Comment