मोटिव्हेशन ऑफ द डे...

आजकाल मला रोज सकाळी ऑफीसला जायचा प्रचंड कंटाळा येतो. तशी म्हणायला मी अजुन कामात नवखी असले (स्वत:च्या चुका नजरेआड करायच्या वेळी ही आर्ग्युमेंट बरी पडते) तरी सुरुवातीपासूनच मला रुटीन चा कंटाळा फार लवकर येतो. खरतर चूक माझी नाहीए, रूटिन हा शब्दच इतका रूटिन आहे की कोणालाही त्याचे ओझे वाटावे. त्यात मी तर नुकतीच बॅचलर पॅड का काय म्हणतात ते अवघे अडीच वर्ष एन्जॉय केलेले.... सकाळी अन्थरुणातुन उठताना ब्रम्हाण्ड न अठवेल तर नवलच!

आता I hate Mondays इथपर्यंत गोष्ट असेल तर चालते पण इथे तर रोजचेच रडगाणे असते... शेवटी बराच विचार करून एक युक्ती काढली 'मोटिव्हेशन ऑफ द डे'... रोज रात्री झोपताना उद्या कोणते काम रोजच्या पेक्षा वेगळे करायचे आहे ते ठरवायचे. उदाहरणार्थ उद्या नव्या पिक्चर ची गाणी ऐकायची आहेत हेडफोन लावून कोडिंग करताना, किंवा डेस्कटॉप चा वॉलपेपर बदलायचा आहे, किंवा लंच बॉक्स मधे नावडती भाजी असेल तर कॅफेटेरीया मधून फ्रेंच फ्राइज खायचेत असे काही...

तुहाला वाटेल हे कसले आले मोटिव्हेशन... पण खरच सांगते इट वर्क्स! आता प्रत्येकाला एक्साईट करणारी गोष्ट थोड्याफार फरकाने वेगळी असु शकते. कोणाला नवीन मूव्ही चे रिव्यूज़ वाचायचे असतात, कोणाला नेहमीची कॅफे लाटे सोडून मोका घ्यावी वाटू शकते, तर कोणाला क्रिकेट ची ट्रायांग्यूलर सिरीज चालू आहे त्याचा स्कोर ऐकायचा उत्साह असु शकतो...

पण एखादे असे मस्त काम ज्यावर ऑफीस ला गेल्यावर मिनिट दोन मिनिट घालवावे. आणि मनाला ताजेतवाने करावे. मग उत्साहाने कामाला सुरूवात करावी, काहीवेळा ह्या सकाळच्या मोटीव्हेशन ची जादू म्हणून की काय पण आदल्या दिवशी डोके फोडले तरी प्रोग्रॅम मधे लक्षात न येणारा बग दुसर्‍या दिवशी तासाभरात सॉल्व्ह होतो. एकदा काम व्हायला लागले की दिवस कसा जातो ते कळत सुद्धा नाही... माझ्यासाठी कुठलेही इन्स्पिरेशनल कोट्स वाचण्यापेक्क्षा हे छोटेसे काम सो कॉल्ड रूटिन मधे नविण्य आणते, तुमच्यासाठी वर्क आउट होते का पहा...

No comments:

Post a Comment