......

भावनेच्या हिंदोळ्यावर शब्द जणू पाचोळ्यासारखे तरंगत गेले, वाट फुटले तिथे भिरभिरत राहीले. शोधत राहीले गर्दीतला एखादा ओळखीचा चेहरा, रानवाटेवर उमललेला चाफा, शिशिरातले चांदणे, आषढातील कृष्णमेघ, काहीतरी कुठेतरी गवसेल ह्या खुळ्या अशेने...

कधी एकटे तर कधी क्षणभराच्या सोबतीने चालत राहीले.

ज्याची सोबत कधीच सुटत नाही आणि सोडवतही नाही ते असते एकटेपण, कधी जनातले, कधी चित्तातले, कधी जपलेले, तर कधी स्वतःवरच ओवाळुन टाकलेले... कधी-कधी उमजलेले बरेचदा न समजलेले. शब्दही एकटेपणाच्या सोबतीने तरंगत राहीले. क्षणभरच विसावा शोधण्यासाठी कदाचित...

पण विखरत जाणार्‍या ह्या शब्दांना खरच हवा होता का विसावा?
की वार्‍याबरोबर दरवळणार्‍या गंधासारखी त्यांनाही विरघळण्याचिच ओढ होती?

शेवटी अस्तित्वासाठी सुरू असलेली धडपड च बरेचदा ते नाहीसेही करते. त्याउलट विरघळणारा प्रत्येक घटक मात्र अस्तित्व संपूनही मागे ठेवतो एक ओळख.... चंदनाच्या सुवसासारखी.... अठवणीत आणि साठवणीत सुद्धा.

भिरभीरणार्‍या ह्या शब्दांना अखेर मिळाली एक जागा. रेशेवर स्थिरावले अलगद तेंव्हा तयार झाली एक सुंदर कविता, जेंव्हा मी कवितेत गुन्तायची संपले, तेंव्हा माझ्यासाठी ती पूर्ण झाली होती, कारण कवितेचे आणि माझे खरे नाते ती पूर्ण होईपर्यंतच, त्यानंतर मी ती स्वाधीन करते,

अश्याच असंख्य भावनांच्या हिंदोळ्यांना विसावण्यासाठी.....

शुभ दीपावली



सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. माझी इथली चौथी दिवाळी आहे. मागील तीनही वेळेप्रमाणेच ह्याही वेळि मित्र मैत्रिणिसोबत मस्त एन्जॉय करणार आहे. बाकी आईच्या हातचा फराळ, शेव, करंजी चिवडा, अनारसे हे सगळे मिस करणार आहेच. ह्यावेळी बूकगंगा वरुन काही छान दिवाळी अंक डाउनलोड केले आहेत. ते वाचण्यासाठी उत्सुक आहे. दिवाळी चे शुभेच्छा पत्र सगळ्यांना ईमेल मधून पाठवण्याचा एक नवीन उपक्रम करणार आहे. लेट्स होप तो सक्सेस्फुल होवो.

Different Strokes...

Autumn सुरू झाला तशी सगळिकडे रंगांची मनसोक्त उधळण सुरू झाली आहे. रोजच्या वर्दळीच्या वाटेवरच्या झाडांनी सुंदर रंग धरण केले आहेत. नारिंगी, गुलाबी, तांबडी, पिवळी, शेंदरी, करडी, अशी असंख्य रंगांची पखरण... दूरवर नजर फिरवली की निसर्ग चित्रातले हे Different Strokes मन मोहून टाकतात. ह्या वेगवेगळ्या रन्गान्प्रमाणेच निरनिराळे मूड्स व्यक्त करणारी माझ्या मनातली काही क्लासिक गाणी...


अभी ना जाओ छोडकर
देवानंद च्या evergreen collection मधलं माझ अत्यंत आवडत गाण. सर्वात आधी गाण्यातला ठेहेराव मन जिंकून घेतो. वाक्यात अक्षरशः गुंफलेले शब्द, देव आणि साधना ची अप्रतिम केमिस्ट्री, आणि आशा-रफी चा मेलोडियस आवाज. सगळेच मन्त्रमुग्ध करते. गाणे संपते तेंव्हा नेहमीच "अजुन थोडे ऐकवा ना please" असे मला दर वेळी वाटत राहते...


अभी अभी तो आई हो बहर बनके छाइ हो
हवा जरा मेहेक तो ले नजर जरा बेहेक तो ले
ये शाम ढल तो ले जरा ये दिल सम्भल तो ले जरा
अभी तो कुछ कहा नाही अभी तो कुछ सुना नाही...


ठन्डी हवा ये चांदनी सुहानी...

खास किशोर style मधले गाणे. कधीतरी उदास वाटत असताना tune in करावे आणि चटकन एखादे कोडे उकलल्यासारखे व्हावे, कितीही frustrated असेन तरी सहज गाण्यात हरवून जावे. न राहवून गाण्याच्या ओळि ओठांवर येतातच.

सारे हसीन नझारे सपनो में खो गये
पर्वत भी आसमाँ पे सर रख के सो गये
मेरे दिल, तू सुना कोई ऐसी दास्तान
जिसको सुनकर मिले चैन मेरी जान...
मंजील है अनजानी... :)



वो शाम कुछ अजीब थी...
एकटेपणा नेहमीच वाईट नसतो, कधीतरी तो एकट्याने बसून अंतर्मुख होऊन स्वता:त हरवलेल्या अनोळखी चेहेर्याला शोधायलाही लावतो. अश्या वेळि हरवलेले गीत शोधताना कातर होणारे मन, सन्ध्यकळ्चि हूरहुर ह्या गाण्यात इतकी नेमक्या शब्दात व्यक्त होते की क्षणभर स्वता:चाही विसर पाडवा. एखाद्या जुन्या विचारात मन नकळत गुंतून पाडाव...


झुकी हुई निगाह में काही मेरा खयाल था
दबी दबी हसी में इक हसीन सा गुलाल था
मैं सोचता था मेरा नाम गुनगुना रही है वो
ना जाने क्यूं लगा मुझे की मुस्कूरा रही है वो


आपकी नझरों ने समझा...

मनातील सारी घालमेल सारी तगमग क्षणार्धात शांत व्हावी आणि संपूर्णपणाचा एक विलक्षण अनुभव मिळाव तस हे गाण प्रत्येक शब्दातून उलगडत जात. शब्द च इतके बोलके की अभिनय सुद्धा कमी पाडवा.


आपकी मंजील हूं मै, मेरी मंजील आप है
क्यू मै तुफान से डरु मेरा साहील आप है
कोई तुफानो से केहदे मिल गया साहिल मुझे



ऐसे तो ना देखो...
निरागस ह्या एकाच शब्दात संपूर्ण गाण्याला डिस्क्राइब करता येईल. निरागस शब्द, लोभास अभिनय, अप्रतिम चाल. कितिदाहि ऐकले तरी mesmerize करते हे गाणे.

ऐसे तो ना देखो के हमको नशा हो जाए
खुबसुरत सी कोई हमसे खता हो जाए





माझ्या आवडत्या गाण्यांची लिस्ट अजूनही पुष्कळ वाढु शकते पण सध्या इथेच थांबते, काही गाणी येणार्या ऋतू च्या नावावर करून...

तेरे उतारें हुए दिन...

कधी पहिलाय दुपार ढळ्ताना आणि संजेकडे सरकत जाताना... उतरत जाणारं उन... लक्ख पाण्यावर चमचमणार...त्या उन्हाकडे पहिले की एक आभास निर्माण होतो मनात. खोलवर आतमधे, कुठेतरी लपलेली न गावसलेली गुपिते उलगडत गेल्यासारखे वाटायला लागते, पाण्यावर पडणारा एखादा सोनेरी किरण क्षणभर त्या थेंबात चमकतो, लुकलुकतो... काहीतरी क्षणिक मिळाल्याचा एक कोवळा आनंद, आबोलीची कळि उमलते ना तसे त्याचे सौंदर्य, अगदी किंचित उमललेले आणि खूप सारे मिटलेले...

हळूहळू उन मनाच्या कप्यांमधे पाझरत जाते, त्याचे असंख्य कवडसे बनतात मनात, जपून ठेवलेले काही क्षण नकळत वलयांकित होतात... गार्दिमधून एखादा स्पॉट लाइट फिरावा तसे काहीसे, कधी ते व्यक्तीशी, स्थळाशी जोडलेले असतात आणि बरेचदा नसतातही, एक अनाकार आकृती असते, कोणाची-कशाची काही माहीत नाही.. पण त्यावेळी जाणवते ती फक्त हूरहुर, एखाद्या जुन्या उबदार स्वेटर सारखे चढवलेले अन् उतरवून ठेवलेले ते दिवस, स्वेटर जिर्ण झाले तरी त्याची मखमल आणि उब मात्र तशीच कायम असते, त्या स्वेटर कडे बघून मायेने त्यावरून हात फिरवला की ती उब मनात दाटून येते, नकळत डोळ्यांच्या कडेतही..., त्या दिवसांना अंगाभोवती गुन्डाळून त्या वलयांकित आकृतीला जिवंत करतो, आठवणींना अंगावर चढवल्याचे समाधान...




तेरे उतारें हुए दिन....

तेरे उतारे हुए दिन
टँगे है लॉन में अब तक
ना वो पुराने हुए है
ना उनका रंग उतरा
काहीं से कोई भी सिवन अभी नाही उधड़ी

एलैईची के बहूत पास रखे पत्थर पर
ज़रा सी जल्दी सरकाया करती है छाव
ज़रा सा और घाना हो गया है वो पौधा
मैं थोडा थोडा वो गमला हाटाता रेहता हूँ
फकिरा अब भी वहीं मेरी कोफी देता है

गिलहरियों को बुलाकार खिलाता हूँ बिस्कूट
गिलहरियाँ मुझे शक़ की नज़र से देखती है
वो तेरे हाथों का मस्स जानती होंगी

कभी कभी जब उतरति है झील शाम की छत से
थकी थकी सी ज़रा देर लॉन में रूक कर
सफेद और गुलाबी मुसंबी के पौधो में घुलने लगती है
की जैसे बर्फ का टुकड़ा पिघलता जाए विस्की में

मैं स्कार्फ उन दिन का गले से उतार देता हूँ
तेरे उतारे हुए दिन पहेनके अब भी मैं
तेरी मेहेक में काइ रोज काट देता हूँ

तेरे उतारे हुए दिन
टँगे है लॉन में अब तक
ना वो पुराने हुए है
ना उनका रंग उतरा
काहीं से कोई भी सिवन अभी नाही उधड़ी

-- गुलज़ार

इंजिनीयर्स डे, कोड, बग्स आणि स्पाइडरमॅन

(इंजिनीयर्स डे च्या निमित्ताने माझ्या सगळ्या इंजिनियर मित्रांसाठी ही पोस्ट. एखाद्या टिपिकल दिवशी ऑफीस मधे काम करताना घडलेल्या काही गोष्टी आणि त्याच ओघाने सुचलेले, थोडे धाडसी, थोडे मार्मिक आणि थोडे वैचारिक...)



सकाळि Facebook उघडले आणि लोकांचे स्टेटस अपडेट्स पाहून लक्षात आले की आज इंजिनीयर्स डे आहे. नंतर अनेकदा Forward झालेला इंजिनीयर्स डे चा Quote पुन्हा नव्याने मेलबॉक्स मधे वाचला...

You can be a Doctor and save lives…
You can be a Lawyer and defend lives…
You can be a Soldier and protect lives…
But why to play with other’s life???

So we simply became an engineer to screw up our own life
Happy Engineer’s Day…!!

तो वाचला, आणि नेहमीसारखाच गंमत म्हणून सोडून दिला. पुन्हा रोजच्या कामाला सुरूवात झाली… लॅपटॉप कनेक्ट केला, कॉफी अणलि Emails चेक केले, आणि बघता बघता कामाने वेग घेतला, दुपारपर्यंत कामाचे अगदी perfect atmosphere तयार झाले, मला अंधारात काम करायला जाम आवडते, नवीन प्रॉजेक्ट रूम चे दिवे थोडेसे डिम केले, आज बाहेर ढगाळ वातावरण होते, त्याने अजुनाच जास्त favourable...

दोन मॉनिटर्स, Toolbar वर उघडलेले सतराशे साठ टॅब्स, कानात हेडफोन्स, बाजूला कॉफी चा कप, जागा मिळेल तिथे आणि तसे ठेवलेले कागद, आधून मधून येणारे IMs, मी आणि माझा कोड, Just like the Dream (?) Life of any other software engineer...!

सकाळीच अगदी नवा कोरा कोड लिहायला घेतला, सगळे काही सुचेल तसे कोड करत गेले, Whitebox वगैरे करण्याच्या आजीबात फंदात पडले नाही. For those who dont know it, “Just like all my dear friends, I too belive in Faith Based Programming.. म्हणजे आपण आपले Programming करत जायचे, with an immense faith that it wont fail whitebox.... (!)

तर हे असे faith based programming केल्यावर, जेंव्हा फाइनली दुपारी whitebox करायला सुरूवात केली, तेंव्हा अपेक्षेप्रमाणे (?) प्रोग्रॅम ने बग्स दाखवायला सुरू केले. एक बग फिक्स केला की दुसरा आणि दुसरा फिक्स केला की तिसरा. मग वाटायला लागले की मी एका अश्या धरणाच्या भिंतीला पडलेले भोक बुजवत आहे ज्याने एक मोठा पाण्याचा प्रवाह अडवून धरला आहे, एक भोक बुजवले की दुसरे फुटते आणि ते बुजवले की तिसरे. शेवटी मी पूर्ण भिंतच पुन्हा बंधायला घेतली. जुना प्रोग्रॅम rename करून save केला, आणि “there arrived yet another time for faith based (?) programming….”

विचार करता करता लक्ष सहज खिडकीबाहेर गेले, खिडकीत एक जाडजुड दोर लटकत होता, काही वेळापुर्वी तर इथे दोर नव्हता असा विचार करेपर्यंतच त्या दोरावरुन एक माणूस खाली उतरला, कसल्याश्या रबरी हुक ने खिडकीच्या काचेला त्याच्या कमरेभोवती असलेल्या गियर चे दुसरे टोक त्याने हुक उप केले, आणि सबणामधे बुडवलेल्या ब्रश ने तो काचा पुसायला लागला. ते दृष्य पाहून माझ्या बाजूला बसलेला माझा colleague एखाद्या टिपिकल अमेरिकन होईल अगदी तसेच excite झाला… (By the way, ह्या अमरु लोकांमधे excitement चा element एक ग्रॅम जास्तच असतो!) “wow look there is Spiderman outside the glass window… Hey Spidy…” असे म्हणत त्याला Hi करत youtube वर स्पाइडरमॅन चे थीम song मोठ्या आवाजात लावले.

मग ५-१० मिनिटे हातातले काम सोडून आम्ही सगळेच त्या Spidy कडे बघत बसलो, काचेपलिकडुन Spidy ने सुद्धा आम्हाला Hi म्हणत, खालच्या मजल्यावर जाण्यासाठी आपला दोर खाली सोडला…

मी पुन्हा एकदा इंजिनीयर्स डे चा तो quote आठवला, कॉफी चा एक घोट घेत असताना, “तो काचेपली कडचा Spidy, He is Real life superhero, and I decided to be an engineer and screw my life“, अश्या काहीतरी चित्रविचित्र विचारांची भेळ माझ्या डोक्यात हळूहळू जमा व्हायला लागली. थोडा वेळ त्या लॉस्ट स्टेट मधे राहिल्यावर चुकुन लक्ष कोड कडे गेले… मग मात्र प्रयत्न पूर्वक सगळे बाजूला सारून मी पुन्हा माझ्या कोड मधल्या त्या बग्स शी स्वत:ला Spiderman आणि त्या बग्स ना Dr. Octovious समजून लढा द्यायला सज्ज झाले…

......

मनात खूप काही असते पण शब्दात ते हवे तसे उतरत नाही. विचार सिंक उप झाले तर शब्द सापडत नाहीत, कधी कधी शब्दही सापडतात पण ते वाक्यात गुंफता येत नाहीत, वाक्य जुळवली तरी कागदावर मात्र चार वाक्यांच्या अर्थहीन रेघोट्या वाटायला लागतात. लिहायला घेताना स्वत:ला जड्ज करण हल्ली माझे वाढत चाललाय. कितीही प्रयत्न केला तरी स्वत:साठी न लिहिता वाचणार्‍यासाठी लिहायचे असे वळण नुसत्या शब्दांना नाही तर विचारांना आणि पर्यायाने वागण्याला सुद्धा येऊ लागले आहे.

ह्या लिहिणाच्या अट्टाहासापायी मनातले खरे, सुंदर, विशुद्ध, बोलके आणि कधी-कधी निशब्द... असे जे काही आहे ते उमटत नाहीये, आशय गोळा करायच्या नादात पूर्वी प्रवाहाबरोबर वहात जाणार्‍या विचारांची घुसमट होतिये… दुथडी भरून वाहणार्‍या नदीला अचानक बंधारा बांधून सलग काटेकोरपणे वाहण्यासाठी भाग पाडावे तसे काहीसे झालेय…. मग एरविचे मुक्त (स्वैर नाही!) विचार भिंतीवार अदळुन परतात, पुढच्या प्रत्येक वेळि त्यांची ही आंदोलने अजुनच क्षीण होत जातात…


ही स्टेज रीच होणे ब्लॉग करण्याच्या मूळ परपज ला डिफीट करत आहे… माझी अभिव्यक्ती मीच कुठल्यातरी बंद खोलिट कोंडून ठेवालिये असा भास लिहिताना होतोय. हे थांबावायला हवे, विचारांना हे असं बंदिस्त करणं मला जमणार नाही... त्यांनी हवे तसे, हवे तिथे मनसोक्त हुन्दडायला हवे आहे. प्रत्येक क्षणातला आणि प्रत्येक गोष्टीतला आशय शोधायचा, एका डबीमधे तो बंद करून ठेवायचा आणि मग लिहिताना ती डबी उघडून त्याला माळेत गुंफायाचं... खरतर हीच प्रोसेस अंगवळणि पाडायला हवी आहे...


OMG... am I marching towards wrirter's block?!?!

एक भिजलेली सकाळ...

आज सकाळी घराबाहेर पडले, Elevator मधून बाहेर येताना एक क्षण वाटले सगळिकडे धुके पसरलेयं.… पण बाहेर आले अन् हलकेच स्पर्श झाला, तुषारांचा, दवासारखा पाऊस पसरला होता... इतका सुंदर पाऊस या पूर्वी मला कधीच भासला नव्हता. पाऊस जेंव्हा पहिलाय तेंव्हा रिम झिम, किंवा तुफान कोसळणारा. आजचा मात्र खूपच वेगळा होता. सुखावून जाणारा...

सध्या इथे, उन्हाळा संपाण्याच्या आणि हिवाळा सुरू होण्याच्या मधला काळ आहे. थोड्या दिवसातच झाडांचे, गवतांचे रंग बदलू लागतील, बदलणारे रंग अजुन अजुन गडद होत जातील... सगळिकडे मग नुसता रंगांचा उत्सव असेल… आणि त्यानंतर येणार्‍या हिवाळ्याचि चाहूल लागेल...

माझ्याही बाबतीत सध्या असेच काहीतरी सुरू आहे, गेले वर्ष - दीड वर्ष नोकरीत आणि KC मधे स्थिरावले आहे, नाही म्हणायला चांगले मित्र मैत्रिणी सुद्धा हळूहळू झाले आहेत, गाडी असल्यामुळे बाहेर भटकणेहि वाढले आहे, कामातला नावखेपणा, भांबावलेपणाहि जाऊन आता जरा गोष्टी Sync Up झाल्या आहेत… पण आता मलाही चाहूल लागतीये, लवकरच सुरू होणार्‍या नव्या Phase ची, पुन्हा एकदा नवीन जागा, नवीन नोकरी, काही नवीन लोक आणि काही जुनेच मित्र मैत्रिणी नव्याने भेटणार आहेत…

सध्या माझ्याही मनात सरलेला ऋतू आणि येऊ घातलेले क्षण यांची विलक्षण सरमिसळ झाली आहे, एखादे ठिकाण अनोळखी म्हणता म्हणता आपले कधी होऊन जाते कळतच नाही, जागेशी बांधलेले हे धागे चिवट असतात, नुसत्या नावानेच तिथल्या सगळ्या गोष्टींशी आपल्याला गुंतवून ठेवण्याइतके समर्थ असतात….

आजच्या या भीजलेल्या सकाळि त्या पावसाच्या साक्षीने, गाडी चालवताना, मनात उठलेले हे शब्द तरंग.. आणि ओठांवर रेंगाळणारि सौमित्रची कविता…

पाऊस पडून गेल्यावर मन पागोळयांगत झाले
क्षितीजाच्या वाटेवरती पाण्यावर रांगत गेले
थेंबाना सावरलेल्या त्या गवताच्या काडान्चा
पाऊस पडून गेल्यावर मी भीजलेल्या झाडांचा

पाऊस पडून गेल्यावर मन थेंबांचे गारांचे
आईस चकवूनि आल्या, त्या डबक्यातील पोरांचे
मोडून मनाची दारे इवली पाऊले पडती
पाऊस पडून गेल्यावर या ओल्या रस्त्यांवाराती

पाऊस पडून गेल्यावार मी चंद्र चिंब भिजलेला
विझावुन चांदण्या सार्‍या विझलेला ,शांत नीजलेला
पाऊस पडून गेल्यावर मन भिरभिरता पारवा
पाऊस पडून गेल्यावर मन गारठता गारवा......

तीसरे मोरपीस - आमची बाग

खरच जर कधी टाइम ट्रॅव्हल शक्य झाले तर मला थेट जायचं आहे, लहानपणी आमच्या घरासमोर असलेल्या बागेत.

आईने खूप हौसेने लावलेल्या आणि मला प्रचंड अभिमान असलेल्या. ही बाग माझ्या डोळ्यासमोर आजही जशीच्या तशी आहे. एका कोपर्‍यातल्या गुलमोहरापासून दुसर्‍या कोपर्‍यातल्या कण्हेरिपर्यंत मला इथले प्रत्येक झाड अगदी ओळीने आठवते.

ऊन्हाळ्यात तांबड्या रंगाने बहरून आलेला गुलमोहर, गेटवर दीमाखात चढून बसलेला बोगनवेल, दोन्ही बाजूला लिंबाची झाडे, स्वस्तिक, प्राजक्त,पेरू, सीताफळ, कण्हेर हे सगळे इथले सीनियर मेम्बर्स. तर त्यांच्या सावलीत निवांत उभे असलेले जास्वंद, चमेली, मोगरा, कुन्द, अबोली हे जूनियर मेंबर्ज़, त्यातल्या त्यात कोरान्टी, कुन्द, चमेली हे सगळे एक्सचेंज स्टूडेंट्स सीज़नल मेंबरशिप असणारे.

अंगणातल्या पायरीवर सन्ध्याकाळि निवांत बसलं की थंडगार वार्‍याची झुळुक जाईच्या वेलावारून एक मंद सुगंध घेऊन यायची. त्या जाईच्या वेलाचि शान काही वेगळीच होती. बुंध्यापासून सुरू झालेला त्याचा पसारा अगदी गच्ची पर्यंत, आमच्या घराचे नाव त्याने स्वत:मधे सामावून घेतलेले. वेलीच्या खाली दिवाळिमधे येणारि शेवंती. लक्ष्मीपूजनाच्या वेळि इतर लोक बाजारातून खरेदी करत तेंव्हा आमच्या घरच्या ह्या शेवंतीचा मला खूप अभिमान वाटायचा. ह्याच वेलिच्या सावलीत चैत्रात मांडलेली गौरीची आरास, ऊन्हळ्यातिल पन्हे कैरिची डाळ, अगदी सगळे काही तसेच आठवते. गच्चीला अनेक वर्ष जीना नव्हता. जीना नसल्याने जाईची फुले गच्चीतून तोडता येत नाहीत, ती खाली पडली तरच वेचता येतात ह्या गोष्टीचे मला खूप वाईट वाटायचे.

आई ने अभ्यासाला बोलावू नये म्हणून कित्येकदा आम्ही सर्व भावंडे मुद्दाम मागच्या बाजूच्या पेरूच्या झाडाखाली खेळत बसायचो . पेरूचे झाड आतून पोकळ असते हे माहीत असूनही त्याच्या दोन फांद्याना ओढणीने झोका बांधायचो. आमच्या गच्चीला जीना नाही म्हणून लपून छपुन कधी सज्ज्यावर, तर कधी शेजारच्या गच्चीवर उड्या टाकून पेरू तोडण्यात फार मोठा पराक्रम वाटायचा. कच्चे पेरू तोडू नका म्हणून आजी नेहमी सांगायची पण बरेचदा सज्ज्यावरुन फक्त कच्चे पेरू च हाती लागायचे… :(

भर दुपारच्या उन्हात आई झाडांना पाणी घालायची त्यांच्या भोवती मातीचे आळे तयार करायची, पलापाचोळा साफ करायची. झाडांचे ते लाड पाहून मला खूप कौतुक वाटायचे, पाणी घातल्यावर, भोवती आळि केलेली ती झाडे यूनिफॉर्म घालून निघालेल्या शाळ्करि मुलांसारखी भसायची.

या सगळ्यापासून दूर हौदाच्या जवळ तुळशि वृंदावन होते. त्या तुळशि व्रुन्दावनाचि जागा पाहून माझ्या मनात एक गमतीशीर अनोलॉजी यायची. शाळेत कसे स्टाफरूम पासून हेडमास्तारांची खोली वेगळि असते. तिथे नेहमीच शांत आणि शिस्तीचे वातावरण असते, त्या तुळ्शिभोवति देखील असेच काहीसे वाटायचे. पळापळि करताना चुकुन आम्ही तुळ्शिजवळ गेलो आणि तिला पाय लागला, आणि तेच घरी कोणी पहिले तर नक्की खरडपट्टी निघेल हे माहीत असायचे. त्यमुळे ही तुळस तशी आमच्यासाठी हेडमास्तर च होती

घारपुढच्या ह्या बागेत माझे बरेचसे लहानपण गेले, कितीतरी दंगा, कितीतरी भांडणे, रूसवे, फूगवे, गप्पा गोष्टी, एकमेकांच्या कानात सांगितलेल्या सीक्रेट्स, सावलीतली भातुकली, चैत्रगौरीचे हळदि कुंकू, दीवळित बनवलेला किल्ला, घरात कोणाला न सांगता लपावलेले आणि नंतर सोडून दिलेले कुत्र्याचे पिल्लू, अश्या असंख्य गोष्टींची ती बाग साक्ष आहे. थोडक्यात “आमच्या लहान पणि” ह्या कॉन्सेप्ट ला बागेपासून वेग्ळे करणे खूप अवघड आहे.

टाइम ट्रॅव्हल तर शक्य नाही पण ही अशी बाग पुन्हा एकदा साकरायची हे मी मनात साठवलेले आणखी एक मोरपीस.

दुसरे मोरपीस – चांदण्यांची भेट


लहानपणी सुट्टीत आम्ही चांदण्यातले जेवण करायचो. रात्रीच्या वेळि गच्चित गप्पा मारत जेवण करताना एक एक घास मी त्या चांदण्यांनाही भरवायचे…. रात्री चान्दण्याकडे पाहता पाहता मनात जपलेले हे अजुन एक स्वप्न. एका सुंदर रात्री फक्त चांदण्याच्या सोबतीने निवांत फिरायला जाण्याचे.

नभातल्या त्या कुन्द चान्दण्यांशी गप्पा मारत, अंधारात थोडे ठेचकाळात धडपडत चालत रहावे, लहानपणी रोज भेटणार्‍या या चान्दण्याची सोबत पुढे पुढे घराच्या इवल्याश्या खिडकीतून अनेक वर्ष असूनही नसल्यासारखी झाली, यशाचा अभाळ इतका मोठं होत गेलं की खिडकीतून दिसणारं टीचभर अभाळ त्यापुढे सहज झाकोळलं. चान्दण्याहि मग माझ्यावर रुसल्या, कधी त्यांना शोधायचा प्रयत्न केला तर ढगांमागे दडुन बसल्या, त्यांचा रूसवा घालवण्यासाठी अश्या एका रात्री बाहेर निघायचे आहे, खूप दिवसांनी भेटलेल्या बालमैत्रिणिसारखे त्यांच्याशी मनसोक्त बोलायला… त्यांना पाहून माझ्यातला अल्लडपणा पुन्हा एकदा अनुभवायचा आहे..

त्याही मग हलकेच लुकलुकतील, सगळा रुसवा सोडून माझ्या कडे पाहून मुग्ध हसतील, त्यांच्या हसण्यातले काही कण जमिनीवर साण्डतील. मी ते अलगद उचलून घेऊन मनात साठवेन. आमच्या या अपूर्व भेटीत मग ती निशब्द रात्र देखील बोलकी व्हावी, आठवणींचे माणीक मोती उधळत पुढे सरत जावी.

पहाट वार्‍यात चांदण्यांचा निरोप घेताना मन उगाचच व्याकुळ व्हावे, काहीसे चांदण्यांच्या आठवणीने तर काहीसे त्यांनी मला केलेल्या सोबतीने, "पुन्हा असेच भेटू" असे सांगून जड पावलांनी मी मागे फिरावे, मनात साठवलेला चन्द्रप्रकाश सभोवार उधळण्यासाठी…

पहिले मोरपीस - पुस्तकांची खोली

नाही-नाही, लांबी रुंदी खोली त्यातली खोली नाही, इंग्लीश मधे रूम म्हणतात ना त्यातली खोली. मला लहानपणीपासून बनवायची आहे एक पुस्तकांची खोली. मी नेहमीच तीन चार खोल्यांच्या छोट्या घरात राहिली आहे, पण आपल्या घरी एक छानशी स्टडी रूम असावी असे नेहमी वाटते.

तशी मी वाचन वेडी असण्यापेक्षा लेखन वेडीच जास्त आहे. खरतर माझ्या स्वभवमुळेच. इतरांचे ऐकण्यापेक्षा स्वतःचेच ऐकवणे जास्त प्रिय आहे मला. पण तरीसुद्धा मला एक घरातली ईवलिशी जागा ठेवायची आहे पुस्तकांसाठी.

माझ्या स्वप्नातली ही पुस्तकांची खोली खूप शांत ठिकाणी असावी, खोलीच्या खिडकीला किंवा balcony ला लागून घराबाहेरच्या बागीच्यातली जाई ची वेल असावी. एखाद्या वृक्षाच्या सावलीने या खोलीतला काही भाग पंखाखाली घ्यावा. इथे एका बाजूला पुस्तकांचे कपाट असावे आणि दुसरीकडे मस्त भारतीय बैठकीच्या style चा बिछाना. कपाटामधे काही मोठ्या लेखकांची पुस्तके तर काही अपरिचित लेखकांची पण दुर्मिळ पुस्तके असावित, सारी पुस्तके सूबकापणे माडून ठेवलेली. प्रत्येक पुस्तकावर स्वत: हाताने cover करावे, आणि वळणदार अक्षरात नाव लिहावे. रोज रात्री हाताला लागेल ते पुस्तक काढून वाचता येईल अशी ती मांडणी असावी.

खोलीच्या एका कोपर्‍यात एक मस्त छोटासा CD Player असावा, आणि सोबत जुन्या नव्या गाण्यांच्या Cassettes आणि CDs, non-pirated. दिवसभरचे काम आटोपून कधीतरी रात्री या खोलीत निवांत गाणी ऐकत अन् पुस्तक वाचत पडावे. एखाद्या रविवारी, जेवण केल्यावर सारी दुपार मस्त स्टडी रूम मधे घालवावी.

पुस्तक आणि गाण्यांच्या collection शिवाय इथे पेन, पेन्सिल, पेन्स्टँड, बुकमर्क्स, अश्या internet आणि laptop मुळे दुर्लभ झालेल्या गोष्टींचेही collection असावे. कधीतरी आवड म्हणून वाजवायला घेतलेली किंवा अर्धवट शिकलेली violin, guitar सुद्धा याच खोलीत आपली वाट पहात असावी.


लहानपणी वाचले होते डॉ. आंबेडकरांचे पुस्तकाचे व्यसन, एखादा संदर्भ नेमका कुठल्या पुस्तकातील आहे आणि ते पुस्तक library मधे कोणत्या कप्प्यात आणि कितव्या क्रमान्काला ठेवले आहे इतकी माहिती त्यांना पुस्तकाबद्दल असायची. वाचनाचे इतके व्यसन लागेल की नाही माहीत नाही, पण मनाच्या आणि घरच्या छोट्याश्या कप्प्यात पुस्तकांना एक अढळ्स्थान द्यायला मात्र मला नक्कीच आवडेल.

स्वप्नांची मोरपिसे...

माझी एक मैत्रीण खूप सुंदर चित्र काढते, परवा तिने आपल्या चित्रात रेखाटली होती तिची Wishlist. तिचे चित्र मनाला खूप भावले. आजकाल सगळीकडे धावता धावता आपल्याला नक्की काय हवे होते, ते आपण स्वतःच अनेकदा हरवून बसतो, कधीतरी निवांत बसलो की डोळ्यासमोरुन निघून जाते ही Wishlist. या Wishlist मधल्या सगळ्या गोष्टी आपल्या हाताला लागतीलच असे नाही, पण त्यांना आपल्या शब्दात मांडायला काय हरकत आहे. म्हणून मग मे देखील मांडत आहे इथे, माझ्या स्वप्नांची मोरपीसे, माझी Wishlist…!!!

एक लम्हे की दास्तान...!!!

खूप दिवसांनी आपलीच एखादी जुनी हरवलेली गोष्ट आपल्याला गावसते, आणि मग तिच्याकडे पाहता पाहता आठवणींचे निरनिराळे पदर उलगडत जातात. माझे हे असे नेहमीच होते. आपण अनेक दिवस राहिलेल्या एखाद्या जुन्या गावी कधी अगदी काही वेळासाठी परतावे, आणि आजूबाजूच्या ओळखीच्या गोष्टी जणू आपल्यालाच खुणावत आहेत असे वाटावे..

कधी रणरणत्या उन्हामधे सावलीला एखाद्या झाडाशि उभे रहावे आणि ते प्राजक्ताचे झाड निघावे, त्याच्या फुलांचा सडा टप-टप अंगावर पडावा, त्या सुगंधाने काही क्षण मन मोहरून जावे, नकळत खाली पडलेली दोन टपोरी फुले ओन्जळित घ्यावीत आणि त्याचा सुगंध नुसता उरात भरून घ्यावा. काही वेळापुरता तो क्षण तिथेच गोठून जावा, तो क्षण आपला व्हावा आणि आपण त्याचे. मनात नकळत कुठल्यातरी जुन्या गाण्याच्या ओळि रेन्गाळाव्या...

एक बार वक्त से, लम्हा गीरा काहीं
वहां दास्तान मिली, लम्हा काहीं नहीं


असा हा सरता क्षण मला खूप काही शिकवून जातो. जड पावलानी त्या सरत्या क्षणाचा निरोप घेत मी प्राजक्ताच्या सावलीतून दूर जाते, पुन्हा आपल्या वाटेला लागते, डोक्यावर उन असते पण मनात अजूनही प्राजक्ताची छाया. नकळत मागे वळुन सावली देणार्‍या त्या वृक्षाकडे पहिले म्हणजे वाटते, आपलं अयुष्य हे सळसळतं राहण्यासाठी आहे, अखंड वाहत राहणार्‍या नदीसारखं...

जिथे उभे असतो तिथून पुढे जाण्याची मनाला लागलेली ही ओढच आयुष्याला सळ्सळत ठेवते, साचल्या पाण्यावर फक्त शेवाळे साठते, ते शेवाळे मग पाण्याचं अस्तित्वही नाहीस करून टाकते, पण वाहत्या पाण्याचा नाद मात्र दूरवरूनही त्याच्या आस्तित्वाची जाणीव करून देतो.

पण मग सतत वहात जाताना कधी अचानक मागे वळुन पहिला तर तो सरला क्षण पुन्हा पुन्हा जगावासा वाटतो, असं का? का म्हणून मन पुन्हा पुन्हा जुन्या आठवणीत रमून जाते?

जर वहात रहाणं आणि साचणं हे एकाच वेळि शक्य नाही, तर वाहणार्‍याला साचण्याची आणि साचले असतानाही वाहण्याची ही कसली अनामिक ओढ… ?

विचारांच्या या तन्द्रितच मी समोरच्या नदी पात्राकडे बघते, कठोकाठ भरलेले ते पात्र, अथांग दूरवर पसरलेले, आणि अखंड वहात जाणारे, क्षितिजापर्यंत त्याच्या प्रवाहाची लांबी, माझ्या डोळ्यात मावता मावत नाही…

आणि अचानक मला च माझे पडलेले कोडे उलगडते, मन म्हणते, अगं वेडे, वाहत्या पाण्याला साचण्याची ओढ नसते, त्याला ओढ असते ती प्रवाहाबरोबर वहात जाण्याची, वाट फुटेल तिकडे वाहिली तर तिला आपण नदी म्हणू का? नदी कितीही मोठी असली, तरी तिला किनारा असतो म्हणूनच तिला नदी म्हणतात, जितके महत्व नदीचे तितकेच किंवा त्याहूनही किंचित जास्तच महत्व किनार्‍याचे, कारण तो किनाराच नदीला प्रवाह प्राप्त करून देतो, आपल्या बाबतीतही असेच आहे कदाचित, आठवणींचा हा प्रवाह आपल्याला वहातं ठेवतो, मनात जपलेल्या कडू गोड क्षणांचे कधी आठवांचे सण बनतात तर कधी प्रत्येक क्षणात समरस झालेल्या असतात अनंत काळाच्या आठवणी...

गाडीपुराण.... !!!

हो हो पुराणच.... ते म्हणतात ना, "घर पहावं बांधून, लग्न पहावं करून" तसाच अजुन एक.... "अमेरिकेत गाडी पाहावी घेऊन!" तर ही अशी म्हण बनवण्यामागचे कारण म्हणजे ही तिसरी गोष्ट मी अलीकडेच केली. आणि त्यामागचा अनुभव (एक नाही कमीत कमीत पन्नास अनुभव) ब्लॉगवर टाकले नसते तरच नवल....!!!

खरतरं इथे अमेरिकेत, अन्न-वस्त्र-निवारा यांच्या इतकीच महत्वाची गोष्ट आहे ती गाडी! म्हणजे आपली साधी टू व्हीलर स्कूटी वैगेरे नाही. फोर व्हीलर चकाचक. ती सुद्धा किमान माणशि एक. आता हा देश समृद्ध आहे, हे काळाले, पण म्हणून पायी चालणार्या लोकांसाठी walkways ठेउच नयेत? बर walkway नका ठेऊ, किमान बसेस ट्रेन्स तरी ठेवा महत्वाच्या ठिकाणी जायला...! ते सुद्धा नाही. बर अंतर इतकी जास्त की तसा चालत अंतर कापणे जवळ जवळ अशक्यच. पण तरी माझ्यासारख्या एखादिने केला प्रयत्न, तर गंमत सांगू, या walkways नसलेल्या रस्त्यावर जर एका कडेने चालले आणि traffic पोलीस मामांनी पहिले तर चक्क तुम्हाला walking ticket मिळू शकते!!!

म्हणजे आता चालण्यासाठी रस्ता नाही बनवायचा तुम्ही... आणि कुठलाच पर्याय नाही उरला म्हणून शेवटी आम्ही बापड्यानि चालत अंतर कापायाचा प्रयत्न केला तर वर आम्हाला त्याचा हा असा भुर्दंड! No wonder इथले सूपर हिरोज सगळीकडे उडत पोचतात, किंवा spiderman असेल तर रांगत आणि हो batman कडे स्वतःची स्पेशल गाडी आहे.

म्हणजे बघा ना एखादा सुपर हीरो त्याच्या special powers वापरुन वार्याच्या वेगाने धावत highway वर accident मधे सापडणार्या गर्लफ्रेंड ला वाचवायला जायचा आणि पोलीस मामा अर्ध्या वाटेत तिकीट घेऊन त्याची वाट पाहत असायचे. हे हॉलीवुड वाले लोक सुद्धा डोके लावून मुव्हीज काढतात. तर थोडक्यात असा आहे इथे गाडी चा महिमा!

सरते शेवटी इथे असे मामांच्या धाकाने रस्त्यावर शब्दश: पाउल न टाकता कसेबसे अडीच वर्षे निभावाल्यानंतर finally मी सुद्धा गाडी घ्यायची ठरवली.

खरतरं मुलगी असून cars चे मला वाखाणण्याजोगे वेड-बीड आहे. म्हणजे रस्त्यावर धावणार्या अगदी ९० टक्के गाड्या मी logo पाहून ओळखू शकते. कुठली Benz, कुठली Cadillac , कुठली lexus वैगेर…. Mechanism चे म्हणाल तर fromt wheel drive, back wheel drive, transmission, engine, clutch, gear इत्यादी पठडीचे शब्दही माहीत आहेत. पण बाकी luxuries, exterior, curves याचे मात्र जाम वेड आहे... त्यमुळे मी गाडी घ्यायची ठरवली ती डाइरेक्ट Audi Q2 वरुन सुरूवात झाली.

म्हणजे झाले असे की माझ्या एका बॉस कडे ही गाडी होती. मस्त shining black मोठी गाडी. कसल्या कसल्या भारी एकेक luxuries होत्या कार मधे…. झाले मग मलाही Audi च हवी! पण मित्र म्हणाले तशी तू Audi घेऊ शकतेस यात आम्हाला काही शंका नाहीये. पण सध्या जरा खिशात किती पैसे आहेत तेवढे तपासून घे. तसे वरवर हे अगदीच frank आणि friendly suggestion होते, पण मला काय कळायचे ते पुणेरी टोमणे काळाले! शेवटी पुढच्या वेळि जेंव्हा गाडी घेईन तेंव्हा Audi च घेईन अशी शपथ वगैरे घेऊन माझा गाडी पुढच्या गाडी कडे वळवली.

मग असे करता करता Audi, Lexus, BMW अश्या नावांनी सुरू झालेली ही चर्चा Honda Toyota ह्या सस्ति, मजबूत, टीकाऊ गाड्यांवर येऊन थांबली. तसा काही दिवस अंगात Volkswagon चा ताप देखील भरला होता. मी मस्तपैकी जर्मन Passat वगैरे चालवत आहे आणि इतर टीकाऊ low maintenance Japanese गाड्यांना तुच्छ वगैरे लेखत आहे, असे स्वप्न पण पडले एक दोनदा. (खरतर Japanese काय आणि German काय गाड्या सगळ्याच चांगल्या असतात, पण उगाच कधीतरी अंगात ब्रॅण्डचा ताप चढतो तो असा).

असो, तर आत्ता शोध सुरू झाला गाड्यांचा. नवीन कार घ्यायची इच्छा तर खूप होती, पण एकतर आधीच माझ्या driving skills वर अजुन प्रश्नचिन्ह आहे, त्यात इथे, म्हणजे अमेरिकेत किती वर्ष राहायचे ह्याचा काही नेम नाही. पता चला, उद्या उठून मायदेशी परत जायचे प्लॅन बनताहेत, मग बिचार्या माझ्या Beemer Audi Lexus ला बाय करताना विरह सहनच नसता झाला मुळी... :(

सरते शेवटी used cars पहायचे ठरले. Used Cars घेणार्या लोकांसाठी craigslist, cars.com Edmunds, KBB ही सगळि श्रद्धा स्थान आहेत. मग मी सुद्धा इथल्या रोज वार्या सुरू केल्या. वेग्वेग्ळ्या स्टीकी नोट्स वर लिहिलेले डीलर्स, ओनर्स यांचे पत्ते, फोन नंबर, गाडीचे मायलेज, विन नंबर्स, यांनी माझे टेबल भरून गेले. डेस्कटॉप वरही कार या टाइटल ने सुरू होणार्या डझनभर टेक्स्ट फाइल्स जमा झाल्या.

दर वीकेंड ला कार पहा, टेस्ट ड्राइव्ह घ्या, इंटीरियर- एक्सटीरियर पहा, हुड उघडून तेल पाणी चेक करा, इतके करून घरी आले की कारची हिस्टरी चेक करा, फोन वर तासभर जाणकार लोकांशी चर्चा करा, शेवटी एक किंमत ठरवून त्या गाडीवाल्याला फोन करा, त्याच्याशी घासाघिस, करा हा वीकेंड चा दिनक्रम झाला. अरे हां, घसाघिस वरुन इथली अजुन एक गमतीशीर गोष्ट आठवली. इथे आपल्यासारखे, भाजीपाला, कपडे, पुस्तके ह्यामधे bargaining होत नाही. म्हणजे तसे केलेत तर तुम्ही alien आहात अश्या पद्धतीने लोक तुमच्याकडे पाहतील...! पण गाड्यांच्या बाबतीत मात्र सार्र्रास हजार डॉलर्स पर्यंत bargaining चालते!

शेवटी हे सगळे सोपस्कार यथावकाश पार पडून गेल्या आठवड्यात finally गाडी बुक केली. Toyota Solara . Toyota आहे म्हणून स्मॉल बजेट आणि टिकाऊ तर आहेच पण मस्त टू डोर आहे, स्पोर्ट्स लुक. म्हणून मला जाम आवडली. मी पुर्वी एक डायलॉग मारायचे "आक्च्युयली गाडी विकत घेईपर्यंत सगळ्याच गाड्या आपल्या असतात पण विकत घेतल्यावर मात्र एकच आपली होते." ती आवडली, नाही आवडली काय भरोसा... पण खर सांगायचे तर गाडी अगदी फरारी किंवा मर्स नसली तरी ती माझी आहे आणि शिवाय फर्स्ट कार आहे. So shi will always be close to my heart. In short I am very happy to get my gal pal and eagerly waiting for the exciting ride!!!

On a serious note, ह्या पोस्ट मधे most important म्हणजे सगळ्यान्चे thanks ज्यांनी मला गाडी घ्यायला directly or indirectly help केली. Wish me good luck with my new car!!!

थेट मनापासून....

मराठीमधून ब्लॉग करायला लागल्यापासून, लिहिण्यात खूप मजा यायला लागली आहे. रोज संध्याकाळी घरी आल्यावर कितीही दमले असेन तरी पावले ब्लॉगकडे सहज वळतात. I mean बोटे ब्लॉग कडे सहज वळतात. हौसेने सद्ध्या ब्लॉग चे layout सुद्धा बदलले आहे, नवीन रंग, नवीन पोस्ट खूप excitement आहे. कविता आणि कथा लिहून सुद्धा झाल्या इथे, पण खर सांगायचं तर blogging म्हटलं की ते थेट मनापासून यायला हव, त्याशिवाय मजा नाही रहात त्याची. म्हणूनच आज ही पोस्ट.
थेट मनापासून....

गेले काही दिवस भरपूर काम सुरू आहे. ऑफीस मधे तर असतेच पण घरी सुद्धा आहे. खरतर, इतकी कामाने overloaded झाली असताना मी वैतागायला हविये. येणार्‍या जाणार्‍या प्रत्येकाच्या डोक्यावर खापर फोडून मोकळि व्हायला हविये. घरी येऊन दमुन भगुन कधी एकदा झोपतेय असे dialogue ऐकवायला हवेत. पण To be honest, मी आजिबात वैतागली नाहीए. In fact मी ही माझी अखंड energy आणि stamina भरपूर enjoy करतिये. आळस करत दिवस घालवावा असा कधी कधी सकाळी ५ मिनिट वाटते खरे... पण ते काही वेळच. बाकी एकदा दिवस सुरू झाला की ती धावपळ, लगबग खूप मस्त वाटते, सगळे manage करताना आपला प्रत्येक दिवस खरच किती worthwhile आहे याची जाणीव होते. आणि विशेष म्हणजे ही कसरत जमतेय हे बघून स्वत:चेच कौतुक वाटते. सो थ्री चियर्स फॉर ऑल वर्किंग डेज़!!!

By the way, blogging चा उपक्रम जोरात सुरू आहे, पण ह्याचे main aim, सगळ्या मित्र - मैत्रिणींशी connect होणे आहे.. सो मी तुमच्या comments ची आणि suggestions ची खूप वाट पहात आहे. सध्या तुम्ही सुद्धा माझ्यासारखेच busy असाल असे समजून तुम्हाला benefit of doubt दिले. पण वेळ मिळेल तेंव्हा नक्की comments लिहा. मी वाट बघतिये.

मनातले चांदणे - २

चार साडेचार वाजले असतील. पावसाची रिमझिम आता कमी झाली होती. मी चहाचा कप हातात घेऊन नवीनच लिहायला घेतलेल्या स्क्रिप्ट वर डोके लावत होतो. इतक्यात दारात सदु उभा राहिला. "साहेब आत येऊ? " यावेळचा सदु मला सकाळच्या सदु पेक्षा अगदी निराळच वाटला. गणवेषात अगदी टापटिपीत हातात एक कापडाची पिशवी घेऊन एखाद्या शाळकरी मुलासारखा मी त्याला आत बोलावले. त्याच्या चेहेर्‍यावर आज वेगळिच चमक दिसत होती. कुतुहलाने तो माझ्या खोलीच्या एका कोपर्‍यात, ज्याला मी स्टडी म्हणतो, तिथे कपाटात रचून ठेवलेली पुस्तके न्याहळत होता. मी माझा कागदांचा पसारा आवरला. आणि पाणी देत त्याला म्हटले, " अरे सदु, शाळेतुन इथेच आलास की काय?" " हो साहेब, शाळेतुन सरळ इथेच आलो, मी इथल्या जवळच्या सारकारी शाळेत जातो, घर दूर आहे, त्यामुळे तिकडे न जाता सरळ इथेच आलो. साहेब तुम्ही पुस्तके लिहिता? " सदु सकाळ सारखेच भरभरून बोलत होता. " नाही रे, मी पटकथा लिहितो. पण मला वाचनाची आवड आहे, म्हणून ही पुस्तके" " बोल तुला कोणती पुस्तके वाचायला आवडतात? "

"साहेब मी अत्तापर्यंत फक्त शाळेच्या वाचनालयात मिळणारी पुस्तके वाचली आहेत, काही कथा संग्रह, काही कादंबर्‍या, एक दोन कविता संग्रह सुद्धा... पण साहेब आमच्या शाळेतील वाचनालयात फारशी पुस्तके उपलब्ध नाहीत, सरकार कडून वर्षभरात ठराविक निधी मिळ्तो, त्यातून जी पुस्तके येतात, ती सर्व मुलांना दर आठवड्यात वाटण्यात येतात " काही मुले पुस्तके परत करतात काही करत नाहीत, काही पुस्तके नीट हाताळली जात नाहीत, त्यामुळे फारच कमी पुस्तके वाचायला मिळतात" त्याच्या वाचण्याच्या छन्दाचे मला कौतुक वाटले. मी त्याला गडकार्यांचे गोकुळ वाचण्यास दिले. त्या पुस्तकावरील मुखपृष्ठ पाहून त्याचे डोळे लुकलुकले. "साहेब ह्या पुस्तकातील काही भाग अम्हाला बालभारती मधे शिकण्यास होता" सदु उत्साहाने म्हणाला. " साहेब हे पुस्तक वाचायला दिल्याबद्दल धन्यवाद. साहेब मी पुस्तक कधी परत करू? म्हणजे साहेब तुमची हरकत नसेल तर, मी माझ्यासोबत पुस्तक वाचायला घेऊन जाउ शकतो का? " त्याला मी हसत हसत म्हणालो, " अरे खुशाल घेऊन जा... मी ही सगळि पुस्तके वाचली आहेत, त्यामुळे तू घेऊन गेलास तरी चालेल. तुझी वाचून झाली की पेपर वाटायला येताना परत आणलिस तरी हरकत नाही. सदु त्या पुस्तका कडे कौतुकाने पाहत होता. मी दोघांसाठी चहा टाकला, तो अजुन बराच वेळ मला माझ्याकडच्या इतर पुस्ताकांबद्दल विचारात राहिला.

दोन दिवसांनी सदु सकाळी पेपर सोबत पुस्तकही घेऊन आला. मी घाईत असल्याने पेपर व पुस्तक टेबल वर ठेऊन जायला सांगितले. संध्याकाळी आल्यावर टेबल वर पडलेले पुस्तक पहिले तेंव्हा दिसले की सदु ने त्यावर हिरव्या रंगाच्या जाड कागदाचे कव्हर घातले आहे आणि वर निळया शाईने वळणदार अक्षरात पुस्तकाचे नाव आणि लेखकाचे नाव लिहिले आहे.

त्यानंतर ४ -५ महिने सदु माझ्याकडून नवीन नवीन पुस्तके घेऊन जायला आला. दर वेळि पुस्तक वाचून झाल्यावर तो न विसरता त्यावर वेगवेगळ्या रंगाचे कव्हर घालून त्यावर पुस्तकाचे नाव लिहून परत देत असे. दरम्यान माझ्याकडे कामाचा व्याप बराच. त्यामुळे गेल्या सहा महिन्यात आमची भेट फक्त पुस्तक देण्या घेण्याच्या निमित्ताने होत राहिली.

अश्याच एका सकाळी मी पेपर येण्याची वाट पहात असताना एक नवीनच मुलगा पेपर वाटायला आला. मी त्याला विचारले. काय रे तो दुसरा मुलगा सदु, सदाशीव तो कुठे आहे? आजारी आहे का? तो मुलगा काही ना कळल्यागत माझ्याकडे पहात म्हणाला " साहब हमको कुछ पता नही, हम इधर नया आया है, पेहले हम दुसरे दुकान में काम करता था, अभी इधर शुरू किया है" त्या मुलाला सदु बद्दल काहीच माहीत नव्हते.

त्यानंतर बरेच दिवस मे सदु ची वाट पहिली पण तो आलाच नाही. पेपर एजन्सी मधे चौकशी केली तेंव्हा काळाले तो अचानक एक दिवशी कामावर येईनासा झाला. त्याची शाळा कोणती हे सुद्धा मला नक्की माहीत नव्हते. त्यामुळे तिथे चौकशी करणेही शक्य नव्हते. शेवटी माझ्या इतर कामाच्या गडबडीत, सदुचा विषय कायमचा मागे पडला. केंव्हातरी कपाटातिल पुस्तकात काही वेगवेगळ्या रंगाच्या कव्हर मधील पुस्तके पाहून मात्र त्याची आठवण यायची.

या गोष्टीला सुमारे पाच सहा वर्ष झाली असतील, एका अंतरशालेय निबंध स्पर्धेसाठी मी परीक्षक म्हणून गेलो होतो. त्या स्पर्धेचे वैशिष्ट्य असे की निबंधाचे कोणतेही विषय न देता आपल्या आवडत्या विषयावर निबंध लिहायचे होते. त्या स्पर्धेतील काही निबंध खरोखर सुरेख होते. प्रवासवर्णाने, आवडता खेळ, सूर्योदय सूर्यास्त अश्या विवध विषयावर मुलांनी निबंध लिहिले होते.

परीक्षण करताना एक निबंध हातात आला. त्यात कोकणातील एका सुंदर चांदण्या रात्रीचे वर्णन केले होते, कोकणातील छोटेखानी कौलारू घर, घराच्या समोरील अंगणात तुळशिचे वृंदावन, अंगणातील झोपाळ्यवर बसलेले मुलाचे वडील, आपल्या १० - १२ वर्षाच्या मुलांना पुस्तकातील एक कथा वाचून दाखवत आहेत, असे वर्णन होते. त्या निबंधातील एक एक ओळ वाचून स्पर्धकाला भेटण्याची माझी उत्सुकता वाढतच गेली, त्याचे वळणदार अक्षर परिचयचे वाटले. आयोजकांना स्पर्धकाचे नाव विचारले तेंव्हा त्यांनी सांगितले सदाशीव गाकवाड.

सदुला मी सुमारे सहा वर्षानी भेटत होतो, यंदा तो मॅट्रिकच्या परीक्षेला बसणार होता. त्याच्याशी बोलल्यावर काळाले की तो अनाथ होता. आई वडील यांना त्याने कधीच पाहिले नव्हते. स्वतःच्या बळावर नोकरी करून शिक्षण पूर्ण करण्याची त्याची महत्वाकांक्षा होती. त्यासाठी तो पेपर वाटण्याचे काम करीत होता.

अचानक आश्रामाच्या जगेविषयी वाद झाल्याने तेथील सर्वांना नवीन जागेत स्थलांतरित व्हावे लागले. त्यमुळे त्याचे पेपर वाटण्याचे काम सुटले. शाळाहि बदलली. त्याच्या पुस्तकाबद्दल च्या अवडीमुळे आणि आपुलकीमुळे त्याला एका लायब्ररी मधे काम मिळाले. सध्या तो लायब्ररी मधे पुस्तकांची सफाई ठेवण्याचे व जुन्या पुस्तकांना कव्हर घालण्याचे काम करीत होता. यावर्षी असलेल्या दहावीच्या परीक्षेबद्दल तो नेहमीसारखेच भरभरून बोलत होता. बोलताना त्याच्या निबंधात व्यक्त झालेले मनातले चांदणे त्याच्या चेहेर्‍यावरही पसरले होते.

- समाप्त.

मनातले चांदणे - १

( लहानपणी बालभारातीच्या पुस्तकात अभ्यासाला असलेला माझा आवडता धडा इथे स्वतःच्या शब्दात मांडत आहे. मूळ लेखकाची माफी मागून. काही संदर्भ चुकण्यचि शक्यता आहे. पण या धड्याचे शीर्षक मला आजही स्वच्छ अठवते. मला वाटते आपल्या प्रत्येकाच्याच मनात एक चांदणे असते, गरज असते फक्त ते शोधण्याची. आज सहजच हे लिहिण्याची इच्छा झाली... म्हणून लिहिले. )




सोमवारची सकाळ, नवीन अठवडा सुरू झाला की सगळ्या लोकांची लगबग सुरू होते. तशी आमच्या बिल्डिंग मधे बहुतेक सगळे फॅमिलीवाले. त्यामुळे प्रत्येकाची सकाळची सात चाळीस ची लोकल पकडायची गडबड, मुलांची शाळेत जायची तयारी, थोडक्यात काय एखाद्या टिपिकल सोमवार सकाळसारखी आजचीही. पण नुकताच मान्सून सुरू झालेला, पाउसाची रात्रिपसूनच संततधार लागलेली.. नोकरदार लोकांना ह्या पावसाचे भलते संकट वाटते, आता लोकल पकडायला उशीर, ऑफीस मधे पोचायला उशीर, सगळी कामे खोळंबणार असे विचार थोड्याफार फरकाने प्रत्येकाच्या डोक्यात सकाळपासून सुरू असतात.

मला मात्र ह्या सगळ्याशी काही घेणे देणे नसते... आधीच मी बॅचलर, एकटा राहणारा, आणि त्यात स्क्रिप्ट राइटिंग एजेन्सी सारख्या फील्ड मधे काम करणारा, त्यामुळे वेळेचे फारसे वावडे मला कधीच नसते... बहुतेक वेळा मी उठेन तेंव्हा दिवस आणि झोपेन तेंव्हा रात्र असाच माझा दिनक्रम... त्यात मुंबई चा पाउस म्हणजे माझा जाम आवडीचा, मस्त चहा बनवून, खिडकीत पावसाचे तुषार अंगावर घेत येणार्‍या जाणार्‍याची लगबग बघत राहणे माझे आवडते काम. ते मे अगदी मनापासून करत असतो.

इतक्यात शेजारच्या देशपांडे काकुंचे अगदी तार स्वरात वैतागून तावातावाने बोलणे माझ्या कानावर पाडते, " क्या भैीय्या ये कोई टाइम हुआ आने का, हमने पेपर क्‍यू लागया है, ताकि सुबाह सारी गडबड शुरू होने से पेहले हम पेपर पढ सके, और तुम पपेरवाले अपानाही घर समझ के कभी भी पेपर वाटणे चले आते हो... अभी ये रोज का हो गया है तुम्हारा, आज साहब को तुम्हारी वजह से ऑफीस जाने को लेट होगा तो मैं तुम्हारी इस महिने की पेपर बिल से पैसे काट लुंगी, समझ गये ना" देशपांडे काकुंची ही गाडी कुठून सुरू होऊन कुठे थांबली हे ऐकून मला काही हसू अवरत नाही. पेपरवाल्या त्या पोराचा जीव मात्रा अगदी एव्हडासा झालेला असतो. तो काकुंची बोलणी निमूटपणे ऐकून घेतो, काकू त्याला बिललची धमकी देऊन जवळ जवळ त्याच्या तोंडावरच दार आपटतात.

तो पुढे माझ्या घरी येऊन पेपर चे बिंडोळे माझ्या हातात देतो. त्याच्या चेहेर्‍या वरुन स्पष्ट दिसत असते की देशपांडे काकुंच्या धमकीतून तो अजूनही सावरलेला नाही, पावसाने त्याला कधीच नखशिखांत भिजवलेले असते, एका हातात प्लास्टिकमधे गुंडालालेला वर्तमानपत्राचा गट्ठा सावरत दुसर्‍या हताने तो चेहेर्‍यावर पडणारे पाणी पुसत असतो. माझ्या हातात पेपर चे बिंडोळे देताना उगीचच कसनुसा हसतो. त्याच्या त्या हसण्याने चेहेर्‍यावरचे कारुण्य अधिकच गडद होते. मी त्याला विचारतो " भैीय्या चाय लोगे" तो हसतो, म्हणतो " नको साहेब अजुन बरीच वर्तमानपत्रे वाटायची आहेत, लोक खोळंबलेले असतील, आज पावसामुळे निघायला थोडासा उशिराच झाला, आणि पलीकडच्या गल्लीत पेपर वाटणारा मुलगा आजारी आहे, त्यमुळे त्याचे कामही मलाच करायचे आहे". त्याचे इतके छान मराठी ऐकून थोडा वेळापूर्वीचे देशपांडे काकुंचे मोडके तोडके हिंदी मला आठवते, मी त्याला थांबायचा आग्रह करत नाही.

पण त्याला काहीतरी विचारायचे असते, " साहेब, माझे नाव सदू, पूर्ण नाव सदाशीव गायकवाड, साहेब मी तुमच्या घरी बरीच पुस्तके पहिली आहेत, बरेचदा लायब्ररिची पुस्तके, मासिके सुद्धा वाटली आहेत. साहेब मला सुद्धा वाचनाची खूप आवड आहे, तुम्ही मला वाचायला पुस्तके द्याल? पेपर एजन्सी चा मालक आम्हाला वर्तमानपत्र, मासिके कव्हर करून वाटायला देतो, त्यमुळे ती वाचता येत नाहीत... मी त्याला अनेकदा विनंती केली पण तो म्हणतो भरपूर मेहनत करून सूपरवाईजर हो, मग दुकानावर बस आणि हवी तेव्हडी पुस्तके वाच, पण साहेब मी तर तिथे नवीन आहे, मला सूपरवाईजर व्हायला अजुन किमान 2-3 वर्ष लागतील. साहेब तुम्ही खूप पुस्तके वाचता. मला सुद्धा वाचायला शिकवाल चांगली पुस्तके?" अगदी एका दमात सगळं काही बोलल्यावर सदु थांबला. चेहेर्‍यावरचे पाणी पुसत तो पुन्हा वर्तमानपत्राची बॅग सावरू लागला.मी त्याला म्हणालो, " सदु मी तुला नक्की पुस्तके वाचायला देईन, पण आत्ता तुला पेपर वाटायला उशीर होतोय ना, तू आज संध्याकाळी घरी ये.. मग आपण बोलूया. माझे हे उत्तर ऐकून सदु आनंदाने पण थोड्या लगबगितच पेपर वाटायला पळाला.

काहीं दूर जब दिन ढल जाए...

खरतर मला सूर्यास्त खूप आवडतो. सूर्यास्त, संध्याकाळचा गार वारा, पक्ष्यांचा किलबिलाट, या सगळ्याची मी प्रचंड फॅन आहे. सूर्यास्ताची वेळ दिवसभरातील माझी favorite. म्हणजे पहाटेची साखरझोप, सकाळची लगबग, दुपारची अर्धवट पेंगत आणि झोप जावी म्हणून चहा घेत डोळे ताणुन काम करायची वेळ, किंवा रात्री finally I can hit my bed now… या सगळ्या वेळांचे महत्व आपापल्या ठिकाणी आहेच. पण संध्याकालाचे तसे नसते, ऑफिस मधुन आल्यावर दिवसभर आपण काहीतरी fruitful केले (अगदी कधी कधी दिवसभर यथेच्छ कालहरण I mean time pass तरीही) याचे समाधान असते. आपले घर आपल्याला बोलावत आहे असे वाटते. अगदी माझ्यासारख्या परक्या देशात आणि perfectly strange unknowen city मधे एकटीने रहाणिरिला सुद्धा घरची ओढ लागते, मग जे family सोबत राहत आहेत त्यांची तर गोष्टच सोडा.

अश्या सुंदर संध्याकाळी घरी येऊन मस्त चहाचा कप हतात घ्यावा, laptop वर सलील-संदीप चे 'आयुष्यावर बोलू काही' लावावे. बाहेर साचलेल्या बर्फाकडे खोलीच्या खिडकीतून पहात गाणी गुणगुणत निवांत तास दीड तास, (अगदी घडाळ्याकडे न बघता) घालवावा. माझ्या Me Time एन्जॉय करण्याची ही perfect definition आहे.

अश्या वेळी कोणि online ping करू नये, in fact online जाउ च नये, आणि तरीसुद्धा online असणे माझ्यासारखा तुमच्या ही जिवनाचा अविभाज्य घटक I mean integral part बनलच असेल तर invisible राहावे. फोन सुद्धा silent mode वर करून ठेवावा, roommate ला काहीतरी थाप मारुन खोलितच बसावे, चुकुनही common area मधे भटकू नये, नाहीतर तुमच्यातील light bills, rent, grocery, lunch, dinner अश्या कधीही न संपणार्या विषयावर बोलणे सुरू होईल आणि सन्ध्यकाळचि सुंदर वेळ बघता बघता कपूरसारखी उडून जाईल.

कपातुन चहाचा एक एक घोट घेताना, नकळत दूर घरच्या आठवणींमधे रमुन जावे. थेट पोहोचावे घरातल्या टिपिकल संध्याकाळी असाच आई सोबत बसून चहा घेताना, मस्त गॉसिप करावी, कॉलेज मधल्या आवडत्या आणि नवडत्या मित्र मैत्रिणिंच्या लाइफ मधे काय चालले आहे हे आई ला सांगावे. त्यावर आपली मते मांडावी. आई ती शांतपणे ऐकून घेते. माझ्या काही वाटण्या न वाटण्या ने मित्रांच्या आयुष्यात काही फरक पडणार नाहीये हे तिला कळलेले असते. पण माझे स्वतंत्र विचार मांडायला मी समर्थ आहे आणि ते मांडायची माझी वैचारिक पातळी (?) I mean level of thinking डेवेलप झाली आहे हे सांगण्याचा माझा खटाटोप मी सुरुच ठेवावा.

मग अगदी कपातला चहा संपला तरी माझी मत प्रदर्शन काही संपत नाही. आई चा चहा केन्व्हाच संपला असतो.. आणि ती संध्याकाळच्या जेवणाच्या तयरिलाही लागलेली असते. पण मी मात्र अजूनही एक पाय दुसर्या पायावर रोवून ओट्यशेजारि टेकून उभे राहून आईला काही बाही ऐकवत असते... सहज माझे लक्ष खिडकीतून बाहेर जाते. सूर्यास्त जवळ जवळ संपलेला असतो. सूर्यास्त संपून अंधार पडायच्या अगदी आधीची वेळ, twilight time…

पक्ष्यांची शाळा आता झाडावर भरलेली असते, झाडाच्या पानांचा सळसळाट मिनितागणिक वाढतच जातो, ही संध्याकाळची वेळ मात्र मनाला उगाच हूरहुर लावून जाते. आज इतक्या आरामात आईशी गप्पा मारणारी मी उद्या कुठे असेन कोण जाणे. हे माझे मित्र मैत्रिणि ज्यांच्या लाइफ वर मी आज अगदी सहज हक्काने मते नोंदवून मोकळी होते, ते जगाच्या कुठल्या टोकाला असतील, आणि काय करत असतील, पक्ष्यांचा हा किलबिलाट काही वर्षांनी असाच माझ्या कानी पडेल का, असे काहीतरी विचित्र प्रश्न मला पडायला लागतात. मग कळते ह्या वेळेला कतरवेळ का म्हणतात..

आज जेंव्हा दूर देशी बसून माझ्या खोलीच्या खिडकीतून तीच कतरवेळ पाहते, तेंव्हा ना समोर आई असते, ना सांगायला तेंव्हा सारखे आवडते आणि नावडते असे वर्गीकरण करण्या इतपत मित्र मैत्रिणी, ना कानावर पक्ष्यांचा किलबिलाट ना झाडांचा सळसळाट... पण हातातल्या चहाच्या कपकडे पाहून वाटते मनातल्या अठवणि चहातील साखरेप्रमाणे विरघळुन राहिल्या आहेत, त्यांचे अस्तित्व मानले तर खूप मोठे आणि नाही मानले तर क्षुल्लक आहे.

कोणाला माहीत कदाचित काही वर्षांनी अजुन एका perfectly strange ठिकाणी मी अशीच हातात चहाचा कप घेऊन आत्ताचे हे दिवस आठवत असेन, हा विचार मनात येताच हातातला तो निसटून जाणारा twilight time मी पुन्हा cherish करायला लागते, मनापासून जगायला लागते...

माझा देव

माझा देव कोणी मुर्तीत पहिला
माझा देव कोणी मंदिरात पहिला
माझा देव कोणी माणसात पहिला
पण माझा देव आहे का हो माझ्यात राहिला?

माझा देव कोणी प्रार्थानेत गायला
माझा देव कोणी श्लोकात म्हटला
माझा देव कोणी पोथित वाचला
पण माझा देव आहे का हो माझ्यात राहिला?

माझा देव साखर दाण्यात पोचला
माझा देव तीर्थ रूपाने पोचला
माझा देव अंगार्‍यातही पोचला
पण माझा देव आहे का हो माझ्यात राहिला?

खरतर माझा देव माझ्यातच असतो
भांबवलेल्या मानवर मायेची पाखर
दुखावलेल्या मानवर प्रेमाची फुंकर
आणि अशाळलेल्या मनावर आशिर्वदाची छाया तोच धरतो

मी मात्र माझ्या देवाला मंदिरात, श्लोकात, अन् तिर्थात शोधतो
माझा देव माझा आहे अन् तो माझ्यातच भरून राहिला...

-- गौरी

आज वाटते

आज वाटते कुठेतरी भटकावे
मउ गवतावर निवांत पडून राहावे
निळ्याशार अभाळाला घ्यावे अंगावरती
करव्यात नेहमीच्याच तरीही नव्या काही गोष्टी

आज वाटते कुठेतरी भटकावे
समुद्राच्या काठी वाळुवरति
तुझ्या अन् माझ्या पावलांचे ठसे ऊमटावे
ओन्झळित घ्यावे दोन मोती
एक माझा आणि एक तुझ्यासाठी

आज वाटते कुठेतरी भटकावे
गर्द हिरव्या रानात आणि नदीच्या काठी
पान पान झाड झाड सामील होतील हसण्यामाधे
भरून राहील तुझा नि माझा
निशब्द स्वर आसमन्ति

आज वाटते कुठेतरी भटकावे
डोंगर दर्‍यात टेकडी वरती
लहानपणी सारखे खेळुया धावत
सांगा तुमची दगड कि माती

आज वाटते कुठेतरी भटकावे
फक्त तुझ्यासाठी अन् माझ्यासाठी
नको ती धावपळ नको ती गजबज
हीच तर आहे दोन क्षणांची विश्रांती

-- गौरी

मोटिव्हेशन ऑफ द डे...

आजकाल मला रोज सकाळी ऑफीसला जायचा प्रचंड कंटाळा येतो. तशी म्हणायला मी अजुन कामात नवखी असले (स्वत:च्या चुका नजरेआड करायच्या वेळी ही आर्ग्युमेंट बरी पडते) तरी सुरुवातीपासूनच मला रुटीन चा कंटाळा फार लवकर येतो. खरतर चूक माझी नाहीए, रूटिन हा शब्दच इतका रूटिन आहे की कोणालाही त्याचे ओझे वाटावे. त्यात मी तर नुकतीच बॅचलर पॅड का काय म्हणतात ते अवघे अडीच वर्ष एन्जॉय केलेले.... सकाळी अन्थरुणातुन उठताना ब्रम्हाण्ड न अठवेल तर नवलच!

आता I hate Mondays इथपर्यंत गोष्ट असेल तर चालते पण इथे तर रोजचेच रडगाणे असते... शेवटी बराच विचार करून एक युक्ती काढली 'मोटिव्हेशन ऑफ द डे'... रोज रात्री झोपताना उद्या कोणते काम रोजच्या पेक्षा वेगळे करायचे आहे ते ठरवायचे. उदाहरणार्थ उद्या नव्या पिक्चर ची गाणी ऐकायची आहेत हेडफोन लावून कोडिंग करताना, किंवा डेस्कटॉप चा वॉलपेपर बदलायचा आहे, किंवा लंच बॉक्स मधे नावडती भाजी असेल तर कॅफेटेरीया मधून फ्रेंच फ्राइज खायचेत असे काही...

तुहाला वाटेल हे कसले आले मोटिव्हेशन... पण खरच सांगते इट वर्क्स! आता प्रत्येकाला एक्साईट करणारी गोष्ट थोड्याफार फरकाने वेगळी असु शकते. कोणाला नवीन मूव्ही चे रिव्यूज़ वाचायचे असतात, कोणाला नेहमीची कॅफे लाटे सोडून मोका घ्यावी वाटू शकते, तर कोणाला क्रिकेट ची ट्रायांग्यूलर सिरीज चालू आहे त्याचा स्कोर ऐकायचा उत्साह असु शकतो...

पण एखादे असे मस्त काम ज्यावर ऑफीस ला गेल्यावर मिनिट दोन मिनिट घालवावे. आणि मनाला ताजेतवाने करावे. मग उत्साहाने कामाला सुरूवात करावी, काहीवेळा ह्या सकाळच्या मोटीव्हेशन ची जादू म्हणून की काय पण आदल्या दिवशी डोके फोडले तरी प्रोग्रॅम मधे लक्षात न येणारा बग दुसर्‍या दिवशी तासाभरात सॉल्व्ह होतो. एकदा काम व्हायला लागले की दिवस कसा जातो ते कळत सुद्धा नाही... माझ्यासाठी कुठलेही इन्स्पिरेशनल कोट्स वाचण्यापेक्क्षा हे छोटेसे काम सो कॉल्ड रूटिन मधे नविण्य आणते, तुमच्यासाठी वर्क आउट होते का पहा...

अठवण

अठवण

माझ्या आठवणीत एक गाव आहे
आजीचं गाव असे त्याचे नाव आहे
आजीच्या घरासमोर रोजच सडा रांगोळी
दिवळीच्या दिवसात पणत्यांच्या ओळी

माझ्या अठवणीत एक शाळा आहे
बालपणीचा वास तिथे कायम निराळा आहे
शाळेच्या फ़ळ्यावर शारदेचे चित्र आहे
प्रार्थनेच्या वेळी जागा धरणारा माझा खास वर्गमित्र आहे

माझ्या अठवणीत एक स्वयंपाकघर आहे
भाजी आमटी इतकाच तिथे आ ई चा वावर आहे
सणासुदीला श्रिखंड पुरीचा बेत आहे
एरवि आ ईच्या हातचि पिठले भाकरी सुद्धा गोड आहे

माझ्या अठवणीत एक देवघर आहे
हळद कुंकुवाचा सडा अन् उद्बत्तिचा दरवळ आहे
सोवळं नेसुन पूजा करणारे बाबा माझ्या डोळ्यात आहेत
श्लोक आणि प्रारथनेचे स्वर अजुनहि कानात आहेत

माझ्या अठवणीत एक कॉलेज आहे
आमचे कॉलेज म्हणुन आम्हाला त्याची क्रेझ आहे
कधी हास्याचे तुशार तर कधी कट्यावरचे भांडण आहे
पण् रोजचं नाक्यावरचा चहा आणि कॅन्टिनचा वडापाव कायम आहे

माझ्या अठवणीत असे खुप सारे आहे
माणसांपेक्शा ज्याचे अस्तित्वच निराळे आहे
अठवणीचे अत्तर मनाच्या कुपित बंद आहे
आज हलकेच उघडले तर दरवळला सुगंध आहे

पहिले पान....

या ब्लॉग प्रकरणाला तशी मी नवीन नाहीये. इंग्लीश मधे पूर्वी दोन तीन वेळा ब्लॉग्स पोस्ट करून झालेत. पण माझ्या स्पोकन आणि रिटन इंग्लीश चा मला कितीही अभिमान असला तरी स्वत: ची अभिव्यक्ती मायभाषेत मधे जितकी सहजतेने समोर येते तितकी इतर कुठल्या भाषेत येणे तसे अवघडच. आता हेच घ्या अभिव्यक्ती ला इंग्लीश मधे काय म्हणतात ते सुद्धा आठवत नाहीये मला... मोठ्या हौसेने इंग्लीश ब्लॉग उघडला होता पण अवघ्या चार पोस्ट्स माधेच मला ब्लॉगचा आणि ब्लॉग ला माझा कंटाळा आला... इंग्लीश मधे लिहायचे म्हणून मलाही विषय सुचेनसे झाले आणि मी बळेबळेच ब्लॉग करत आहे म्हणून त्या ब्लॉगनेही मला साथ देणे कमी केले... म्हणून हा मराठी ब्लॉग चा घाट घालत आहे. खर तर इथे काय लिहिणार आहे किती लिहिणार आहे हे मलाही पुरते माहीत नाहीये अजुन.... पण नेहमीचेच रोजचेच बरे लिखाण होईल अशी अपेक्षा करते. लेट्स सी....